नगर परिषद चिमूर यांचे दुर्लक्ष नगर परिषदेवर महिलांचा धड़क मोर्चा
चिमूर/ तालुका प्रतिनिधी:चिमूर नगर परिषद मध्ये येत असलेल्या नवीन वस्ती पिंपळनेरी प्रभाग क्रमांक २ मध्ये गेल्या ६ वर्षे पासून पिण्याच्या पाण्याचा नाहक त्रास जनतेला होत असून या संबंधित कित्येक वेळा नगर सेवकाशी तोंडी तक्रारी केल्या व नगर परिषद येथे लेखी तक्रारी महिला पुरुष यांच्या स्वाक्षरी दिल्या गेल्या असून या पाण्याच्या समस्या अजून पर्यत सोडविण्याचा प्रयत्न नगर परिषद करीत नसून याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे महिन्यातून एकदा टँकर येत असून समस्त नागरिकांना पाण्याचा पुरवठा होत नाही व या ठिकाणी असलेली सार्वजनिक विहीर हि जुन्या काळातील असून ती ५ वर्षयागोदार खसली असून या विहिरीतील गाळ उपसून पक्या दर्जाचे काम करून देण्यात यावे याकरिता अगोदर ग्रामपंचायत मध्ये अनेक तक्रारी व ग्रामसभेत चर्चा करण्यात आल्या परंतु सरपंच व सचिव यांनी कुठलाही तोडगा या विषयावर काढला नसून मागील अडीच वर्षे पासून पिंपळनेरी हे गाव नगर परिषदेमध्ये समाविष्ट करण्यात आले असून या समस्सेकडे नगर सेवक व नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी ,पाणी पुरवठा विभाग यांचे दुर्लक्ष होतांना दिसून आले असून या समस्या सोडविण्यात याव्यात याकरिता पिंपळनेरी प्रभाग क्रमांक . २ मधील ३० महिलांनी मिळून मुख्याधिकारी नगर परिषद कार्यालय चिमूर येथे पिण्याच्या पाण्याच्या समस्से विषयी निवेदन देण्यात आले .
चिमूर नगर परिषद मध्ये कांग्रेस चे गोपाल झाडे हे नगराध्यक्ष असून त्यांच्या स्वतः च्या प्रभागात भीषण पाणी टंचाई असताना मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याने महिला वर्गात त्रीव संताप ची लाट पसरली आहे विशेष सत्तेतील एका नगरसेवक अब्दुल कदिर शेख यांनी नारू ची समस्या तसेच आठवडी बाजार ची व्यवस्था बाबत आवाज उठवून घरचा अहेर दिला होता नगराध्यक्ष गोपाल झाडे हे कोणती कारवाई करून समस्या सोडविते या कडे लक्ष लागले असून नगराध्यक्ष वर लक्ष ठेवून पाठी मागून कारभार करणारा तो नगरसेवक कोण याची सुद्धा चर्चा रंगत आहे.