Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जून ०८, २०१८

वर्ध्यात सव्वा लाखांचा गांजा जप्त

1.25 lakhs of Ganja seized | सव्वा लाखांचा गांजा जप्तवर्धा/प्रतिनिधी:
 वर्धा शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने वर्धा बस स्थानक परिसरातून १ लाख २८ हजारांचा गांजा जप्त केला. या प्रकरणी अमरावती येथील एका युवकाला अटक केली. ही कारवाई सोमवारी दुपारी करण्यात आली.
संजय अशोक टेकाडे (२८) रा. हनुमान वॉर्ड, अमरावती हा गांजा नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी बसस्थानक गाठत त्याच्या जवळील साहित्याची पाहणी केली. यात मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. गांजाचे वजन १२ किलो ८३० ग्रॅम असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी संजय टेकाडे याच्याविरुद्ध वर्धा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एसडीपी माधव पडिले, ठाणेदार चंद्रकांत मदने यांच्यासह पीएसआय पपीन रामटेके, सचिन धवाळे, मंगेश झामरे, ज्ञानेश्वर निमजे, आकाश कांबळे, नितेश बावणे, प्रेमदेव सराटे, गितेश देवघरे यांनी केली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.