Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जून १९, २०१८

राज्यात सर्वात कमी वीजहानी ऊर्जामंत्र्यांच्या नागपूरात

नागपूर/प्रातिनिधी:
राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गृहजिल्ह्याच्या समावेश असलेल्या असलेल्या महावितरणच्या नागपूर परिमंडलाची (वर्धा आणि नागपूर जिल्हा) वीजहानी राज्यात सर्वात कमी असून आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये नागपूर परिमंडलाने केलेल्या दमदार कामगिरीमुळे येथील वीजहानी 0.77 टक्के कमी करण्यात यश मिळवित सर्वात कमी वीजहानी असलेल्या परिमंडलांच्या यादीत 7.04 टक्के वीजहानीसह राज्यात अव्वल स्थान पटकाविले आहे.
आपण प्रमुख असलेल्या विभागाच्या कामगिरीत आपल्या जिल्ह्याने सदैव अग्रस्थानी असावे हा ऊर्जामंत्री यांचा कायम आग्रह असून वीज वितरण क्षेत्रात नागपूर जिल्हाने राज्याला एक आदर्श उदाहरण घालून द्यावे याबाबत त्यांचा कटाक्ष असतो. त्याअनुषंगाने त्यांनी सदैव महावितरणच्या अधिका-यांना बहुमूल्य सुचना केल्या आहेत. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नेहमी पुढे असलेल्या पुणे, भांडुप आणि कल्याण यांसारख्या सशक्त परिमंडलांना मागे टाकीत नागपूर परिमंडलाने हे यश संपादीत केले असून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राबविलेल्या विविध योजना आणि नागपूर परिमंडलाने आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये वीजबिल वसुली आणि थकबाकीदार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात मिळविलेले यश, वीजचोरीविरोधात सातत्त्याने आक्रमक भुमिका यांसारख्या विविध आघाड्यांवर केलेल्या उपाययोजनांचे फ़लीत म्हणजे परिमंडलाच्या हानीत तब्बल 0.77 टक्कयाने घट झाली आहे.
आर्थिक वर्ष 2016-17 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये नागपूर परिमंडलाला होणारा वीजपुरवठ्यात 6.25 टक्क्यांनी वाढ झाली आहेत तर त्या तुलनेत उच्चदाब वीजविक्री 9.65 टक्क्यांनी वाढली आहे, याशिवाय लघुदाब गैरकृषी वीजविक्री 2 टक्क्यांनी वाढली आहे तर कृषीपंपाकरिताची वीजविक्री 6.70 टक्क्यांनी वाढली आहे, अश्याप्रकारे नागपूर परिमंडलाची एकूण वीजविक्री आर्थिक वर्ष 2016-17 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये तब्बल 7.14 टक्क्यांनी वाढली आहे.
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या नेतृत्वात नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या दैंनंदिन पाठपुराव्यामुळे नागपूर परिमंडलासोबतच नागपूर परिक्षेत्रातील पाचही परिमंडलांनी वीजहानी कमी करण्यात दैदिप्यमान यश मिळविले आहे. यात अकोला परिमंडलाची वीजहानी 2.64 टक्क्यांनी कमी होऊन 19.91 टक्के झाली आहेत तर अमरावती परिमंडलाची वीजहानी 1.19 टक्क्यांनी कमी होऊन 15.80 टक्के झाली आहे. याशिवाय चंद्रपूर परिमंडलाची वीजहानी 0.41 टक्क्यांनी कमी होऊन 10.73 टक्के तर गोंदीया परिमंडलाची वीजहानी 0.60 टक्क्यांनी कमी होऊन 15.53 टक्क्यांवर आली आहे.नागपूर शहरातील तीन विभाग फ़्रॅन्चाइज़ीला मे 2011 मेध्ये देण्यात आले त्यावेळी 35 टक्क्यांहून अधिक वीजहानी असलेल्या फ़्रॅन्चाइज़ीनेही त्यांच्या भागातील वीजहानीचे प्रमाण आर्थिक वर्ष 2016-17 मधीक 15.61 टक्क्यांच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2017-18 साली 14.53 टक्के करण्यात यश मिळाल्याने नागपूर शहरातील वीज वितरण फ़्रॅन्चाइज़ीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे.
आर्थिक वर्ष 2018-19 मध्येही फ़्रॅन्चाइज़ीसह नागपूर परिमंडलाची वीजहानी राज्यात सर्वाधिक कमी राहील, असा विश्वास नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी व्यक्त केला आहे.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.