Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जून १८, २०१८

प्रा. एस.टी. चिकटे यांचे कार्य भरीव व मुलगामी

 समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे प्रतिपादन
चंद्रपुर/प्रतीनिधी:
माणिकगडचं काम स्मृतिशेष प्रा. डॉ. एस.टी. चिकटे यांनी केलं. त्यांनी भरीव व मूलगामी कार्य केलं. शिक्षणाला प्रज्ञा व शिलाची जोड दिली पाहिजे असं भगवान बुद्धांनी म्हटलं. माणसं जोडून घेता आली पाहिजे. समान व मोङ्कत शिक्षण असले पाहिजे असे महत्वपूर्ण विचार ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी प्रा. एस.टी. चिकटे यांच्या ‘‘बौद्ध धम्माची शैक्षणिक क्रांतीङ्कङ्क, निळी किरणं व निळ्या रेजिमेंटचा शिपाई या तीन ग्रंथांच्या लोकार्पण समारंभ निमित्त मुख्य अतिथी म्हणून व्यक्त केले. या लोकार्पण समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभा उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, कवी धर्मराज निमसरकर, सत्यशोधक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक चोपडे, विदर्भवादी ज्येष्ठनेते अ‍ॅड. वामनराव चटप, विदर्भ राज्य ग्रामीण शहरी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर पोतनवार, चंद्रपूर जिल्हा सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष कवी हिराचंद बोरकुटे, एङ्क.ई.एस. गल्र्स कॉलेज चंद्रपूरच्या मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. मेघमाला मेश्राम मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. अशोक चोपडे यांनी प्रा. चिकटे यांना आंबेडकरी चळवळीचे प्रात्यक्षिक म्हटले. प्रा. चिकटे हे खèया अर्थाने निळ्या रेजिमेंटचे शिपाई होते असे कवी धर्मराज निमसरकर म्हणाले. प्रा.डॉ. मेघमाला मेश्राम यांनी प्रा. चिकटे यांच्या तीनही ग्रंथावर प्रकाश टाकला. किशोर पोतनवार व हिराचंद बोरकुटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. चिकटे मुळे विदर्भ चळवळीला एक नैतिक आधार मिळाला असे अध्यक्षीय मार्गदर्शन अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी केले.मूळच्या चंद्रपूरच्या पण आता पश्चिम बंगालच्या खासदार ममता कपीलकृष्ण ठाकूर यांची या लोकार्पण समारंभाला शुभेच्छा देण्यासाठी लाभलेली उपस्थिती आकर्षणाचा विषय ठरली. मा. पन्नालाल सुराणा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
ङ्कुले-आंबेडकरी स्टडी ग्रुप आणि आंबेडकरी साहित्य प्रबोधीनी चंद्रपूरच्या वतीने आयोजित या प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. इसादास भडके व शुद्धोधन मेश्राम यांनी केले. प्रास्ताविक प्रा. शैलेंद्रकुमार चिकटे यांनी केले तर आभार प्रदर्शन स्नेहल चिकटे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयु. शकुंतला चिकटे, आयु. रोशन वाकडे, डॉ. इसादास भडके, सुनील जांभुळे, शुद्धोधन मेश्राम, नागेश सुखदेवे, त्रिलोक शेंडे, मुकेश वाळके, गोपी मित्रा व शैलेंद्रकुमार चिकटे यांनी अथक परिश्रम घेतले. रेडक्रांस भवन चंद्रपूर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास उल्लेखनीय उपस्थिती होती.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.