Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जून ०४, २०१८

विदयुतपुरवठा खंडीत होणेः एक विष्लेशण

दिवस उन्हाळयाचे असले व त्यातही विदर्भ असेल व जर वीज गेली तर डोक्याचा पारा वाढल्याषिवाय राहात
नाही. परंतु, सर्वदूर पसरलेल्या व उन, वारा, पावसाचा मार खाणारी वीजयंत्रणा सर्वत्र उघडीच असते व ती यंत्रणादेखिल अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी बाधित होते. उन्हाळयात अनेकदा अचानक भार वाढल्याने तसेच वादळ, वारा, गारपिट, पूर, झाडयाच्या फांदया, पतंगीच्या मांजामुळे, व चिनी बनावटीच्या धातुचा अंश असलेल्या पतंगीमुळे, पक्षांमुळे व हो साप वीजवाहिण्यांवर चढल्यामुळेसुध्दा वीजपुरवठा खंडित  होत असतो. अनेक ठिकाधी अवैधपणे शिकारीसाठी 11 किव्हो वाहिण्याचा वापर केला जातो. अशावेळेस शिकार तारांच्या संपर्कात येवूनही ट्रीपींगमुळे वीजपुरवठा खंडित होत असतो.
वीज पुरवठा खंडित झाला की जीव कासावसि होतो व ते साहाजिक आहे. विदर्भातील गर्मीत वीजेशिवाय जगणे खरेच कठीण आहे. परंतु वीज जाते व वीजपुरवठा खंडित  होतो व ग्राहकांना विजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त घडतात.
वीज का गेली? का जाते? परत आली तर त्यामागे वीजकंपनीच्या लाईनमेनला त्याचा जीव मुठीत काम करावे लागले असेल? या प्रश्नाचे उत्तर षोधणेही आवष्यक असते. जर रात्री-अपरात्री गेलेली वीज काही वेळात येत असेल तर कोणीतरी लाईनमेन त्या पावसात किंवा अंधारात स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलवर चढलेला असतो. रात्री-अपरात्री वीज गेल्यानंतर काही वेळातच, वीजखांब पडणे, तारा तुटने अषा अपवादात्मक परिस्थतीत परत येते. विजेची यंत्रणा अशी यंत्रणा आहे की ती चालू अथवा बंद करण्यासाठी व्यक्तीची गरज लागते. शिवाय या यंत्रणेत जिवाला धोका असतो. त्यामुळेच एखादया परिसरातील वीजपुरवठा रात्री़च्या वेळी खंडित  लाईनमन आपल्या सोबत्यासांेबत निघतो .
पारंपारिक किंवा अपारंपरिक स्त्रोतांपासून देशाच्या कान्याकोपऱ्यात तयार केलेली वीज ग्राहकांच्या दारात आणणे तेवढे सोपे नाही. किलोमीटर वीज वाहिन्यांचे जाळे देशात सर्वदूर पसरलेले आहे. त्याला ळत्प्क् म्हणतात. हा सारा पसारा उघडा आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचा या यंत्रणेवर परिणाम होवून त्यात बिघाड होण्याची शक्यता असते. चक्रीवादळ, पूर, रस्ते अपघात यामुळे यंत्रणा कधी-कधी ठप्प होते. एखादी उच्चदाब वाहिनी कोसळली तर कधी एखादा जिल्हा किंवा काही तालुके अंधारात जातात. तर कधी हा बिघाड गाव किंवा काही भागापुरताही मर्यादित असतो.पावसाळ्याच्या सुरूवातीला वादळ-वारा व आकाशातील विजेचा कडकडाट सर्वांनीच अनुभवलेला आहे. तारेच्या जाळ्यातून घरात आलेली वीज असो की आकाशात लखलखणारी वीज असो, दोन्ही मध्ये प्रचंड ऊर्जा असते. आकाशात विजेचा कडकडाट सुरू झाला की घरातील वडीलधारी माणसे वीज उपकरणे बंद करतात. कारण उच्चदाबामुळे ते जळण्याची शक्यता असते. दोन विद्युत चुंबकीय क्षेत्र एकत्र आल्याने दाब वाढतो व यंत्रणा बंद पडते. नव्हे तशी सोय यंत्रणा वाचविण्यासाठी केलेली असते.
वीज खांबात वीज पुरवठा उतरू नये यासाठी चॉकलेटी रंगाचे चिनीमातीचे इन्सुलेटर (चिमणी) खांबावर बसविले जातात. बहुधा हे इन्सुलेटर उन्हामुळे किंवा वीजप्रवाहामुळे गरम होतात व त्यावर पावसाचे थेंब पडताच त्याला तडे जातात. ज्यामुळे वीजप्रवाह खांबातून जमिनीत उतरतो. अन् लागलीच आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होवून फिडर (वीज वाहिनी) बंद पडतो. जर हा फिडर बंद पडला नाही तर जिवित अथवा वित्त हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे ब्रेकरची व्यवस्था केलेली असते.
जेंव्हा-केंव्हा वीजपुरवठा अचानक खंडित होतो, त्यावेळी वीज उपकेंद्रातील कर्मचारी जवळच्या उपकेंद्राशी संपर्क साधून त्यांच्याकडे वीजपुरवठा आहे की नाही याची खात्री करत असतात. वीजपुरवठा असल्याची खातरजमा झाल्यानंतर फिडर चालू केला जातो. जर फिडर पुन्हा ट्रीप झाला (बंद पडला) तर मात्र बिघाड झाल्याचे घोषित केले जाते. बिघाड शोधणे तेवढे सोपे नसते. ऊन-वार्याची, पावसाची किंवा अंधाराची पर्वा न करता ही शोधमोहीम हाती घेतली जाते. कधी कधी काही एक किलोमीटर्सचे पॅट्रोलींग केल्यानंतर बिघाड सापडत असतो.जंगलातून वाहिनी गेली असेल अडचणी दुपटीने वाढतात. कधी बंद पडलेल्या वाहिनीवरील सर्व खांब तपासावे लागतात. तर कधी हा बिघाड काही खांबादरम्यान सापडतो.
लाईनमनला, चूक झाली की जीव जाणार, याची खूणगाठ मनाशी बांधूनच खांबावर चढावे लागते. सर्व प्रकारच्या काळज्या घेवूनही वीज कर्मचारी प्राणघातक अपघातात बळी पडण्याच्या घटना अधून-मधून घडतात. वीजपुरवठा जाण्याची आणखी बरीच कारणे आहेत. वीज गेल्यास षांतपणे विचार केल्यास वीजकर्मचारी आपल्यासाठी कसा जीव धोक्यात घालत वीजपुरवठा सुरू करण्यात लागला असतो.
पावसाळ्यात विजेबाबत घ्यावयाची काळजी याबद्दलची माहिती.
आपल्या घरात म्स्ब्ठ ैूपजबी . म्ंतजी स्मंांहम ब्पतबनपज ठतमंामत असणे गरजेचे आहे, जेणेकरून घरातील वीज यंत्रणेत बिघाड झाला तर वीजपुरवठा बंद होऊ न जिवितहानी टाळता येईल.
1 अर्थिंग सुस्थितीत असली पाहिजे. गरजेनुसार त्याची तपासणी करावी.
2 वीज उपकरणे किंवा वायरिंग ओलाव्यापासून, किंवा पत्र्यापासून सुरक्षित असावी.
3 वीज उपकरणे हाताळताना पायात स्लिपर घालावी व वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री करावी.
4 विद्युत खांबाला व ताणाला जनावरे बांधू नयेत.
5 विद्युत खांबाच्या खाली गोठे किंवा कडब्याची गंजी उभारु नयेत.
6 वीजपुरवठा खंडित झाल्यास 15 ते 20 मिनिटे थांबूनच वीज कंपनीला संपर्क करावा. सोबतच फक्त आपलाच वीजपुरवठा बंद आहे कि आजूबाजचा सुध्दा हेही तपासून बघावे. सर्व परिसारातील वीजपुरवठा ख्ंाडीत झाला असेल तर उपकेंद्रातील यंत्रात नोंदविल्या जाते व वीजपुरवठा पुर्ववत करण्यास लाईनमेन तेव्हाच रवाना होतात.
7 बिघाड नेमका कोठे झाला याची माहिती असल्यास वीज कंपनीला संपर्क करावा, जेणेकरुन तातडीने दुरूस्ती करुन वीजपुरवठा सुरळीत करण्यास मदत होईल.
8 विजेच्या तारा तुटल्यास त्याला हात लावू नये व तातडीने वीज कंपनीला त्याची माहिती द्यावी.
9 विजेसंबंधीच्या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी 18002333435, 18001023435 किंवा 1912 या तीन टोल फ्री क्रमांकाची सोय केली आहे. मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राद्वारे या क्रमांकावर 24 तास सेवा दिली जाते. या क्रमांकावर पहिल्यांदा कॉल करताना ग्राहकांना त्यांचा 10 अंकी ग्राहक क्रमांक व मोबाईल क्रमांक नोंदवावा लागतो. त्यामुळे पुन्हा पुन्हा ग्राहक क्रमांक विचारला जात नाही.

    आंनद वसंतराव कुमरे
             जनसंपर्क अधिकारी, महावितरण, चंद्रपूर परिमंडळ
        7875764577

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.