Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून २७, २०१८

आपुलकीने दाखविली आपुलकी;वर्धा जिल्ह्यातील ४०० गरजू शेतकऱ्यांना बियाणे वाटप

वर्धा/आर्वी /राजेश सोळंकी:
जिल्ह्यात शेतीकामांना सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याची पेरणीची लगबग दिसून येत आहे. पण पावसाच्या गैरहजेरीमुळे काही ठिकाणी पेरण्या लांबल्या तर काही ठिकाणी शेतकरी दुबार पेरणीच्या संकटाला समोर जातो  आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एकंदरीत परिस्थिती बघता,शेतकऱ्यांसाठी नेहमीच पुढाकार घेवून काम करत असलेल्या आपुलकी सामाजिक संस्थेने या वर्षी जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांना बियाणे वाटपाचा संकल्प केला आहे.त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांना गुरुवार दि.२८ जून २०१८ रोजी वर्धा जिल्ह्यात सोयाबीन व कपाशीच्या बियाण्यांचं वाटप करण्यात येणार  असल्याचे आपुलकीचे संस्थापक अध्यक्ष श्री.अभिजीत फाळके पाटील यांनी सांगितले.
     शेतीकरिता होणारा खर्च शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर जात असताना नैसर्गिक आपत्ती मुळे हवालदिल शेतकऱ्यांना मदत पोहचवणे हा समाजाचे कर्तव्य आहे. सध्याचे पेरणीचे संकट लक्षात घेऊन आपुलकीचे अध्यक्ष श्री.अभिजीतदादा फाळके पाटील यांनी आपुलकी सामाजिक संस्था आणि केमफॅब अल्कलीज लिमिटेड 
च्या संयुक्त वतीने वर्धा जिल्ह्यातील कारंजा,उमरी,मदनी,सावळी,ठाणेगाव,नारा,चिंचोली,धामणगाव,वायफाड,
आमला,तीगाव,दहिगाव,भूगाव,जऊळगाव,अल्लीपूर,तळेगाव,इंजाला,दानापूर,पिंपळखुटा,आमगाव,चांदणी,जामणी,तामसवाडा,म्हसळा,खैरी येथील ४०० शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्याचे ठरविले आहे.यात त्यांनी सोयाबीन व कपाशीच्या बियाण्यांचा समावेश केला आहे.याप्रकारची मदत करून शेतकऱ्यांना थोडा दिलासा आणि आधार देण्याचा प्रयत्न ते या माध्यमातुन करीत आहेत.अशा प्रकारची मदत करून शेतकऱ्यांविषयी फक्त कोरडी सहानुभूती न बाळगता त्यांना स्वाभिमानाने जगण्यास ही संस्था मदत करत आहे.
आपुलकीने यापूर्वीही अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम जिल्ह्यात राबविले आहे.देशी बियाणे वाटपासोबतच कृषी अवजार बँक,शेतकी कार्यशाळा,फवाऱ्याच्या सेफ्टी किट चे वाटप,सौरदिव्यांचे वाटप यासारखी शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारी रचनात्मक कामे आपुलकी समाजीक संस्थेने केली आहेत.
  शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या हितासाठी नेहमीच समोर असणाऱ्या श्री. अभिजीत फाळके पाटील यांनी उचललेले हे पाऊल अतिशय महत्वाचे आहे.१२९ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्यानंतरचा आपुलकी सामाजिक संस्थेचा हा आणखी एक मोठा उपक्रम आहे.भविष्यात शेतकऱ्यांसाठी आणखीही मोठे काम उभे करण्याचा त्यांचा मानस आहे. हया उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपुलकी सामाजिक संस्थेचे रितेश घोगरे, नंदू गावंडे, योगेश घोगरे, प्रवीण उगेमूगे, अतुल तिमांडे , नितीन सेलकर , नितीन भोयर, मनोज भांगे, संदीप शेळके, विशाल चौधरी ,सचिन घोडे , उमेश कामटकर, प्रवीण काटकर,अतुल पाळेकर , प्रशांत भोसले, किशोर मुटे, अविनाश महल्ले अथक परिश्रम घेत आहेत.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.