Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जून २८, २०१८

आता लाईन गेली तरी "नो टेन्शन"

 महावितरणचा अभिनव उपक्रम ‘पॉवर ऑन व्हील’
नागपूर/प्रतिनिधी:

नागपूर शहरातील महावितरणच्या वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा मिळण्यासाठी ‘पॉवर ऑन व्हील’ ची अभिनव सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एखाद्या भागातील वितरण रोहीत्र नादुरुस्त झाल्यास, तो रोहीत्र दुरुस्ती किंवा बदली करण्याच्या कालावधीत तेथील वीज ग्राहकांना अंधारात राहावे लागू नये यासाठी महावितरणने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
वितरण रोहीत्र हा वीज यंत्रणेचा आत्मा असतो, यात काही बिघाड उद्भवल्यास या रोहीत्रावरील ग्राहकांना रोहीत्र दुरुस्त किंवा बदली होईपर्यंत अंधारात राहावे लागते, ग्राहकांचा हा त्रास लक्षात घेऊन महावितरणने पॉवर ऑन व्हीलची सुविधा कॉग्रेसनगर विभागातील वीज ग्राहकांसाठी सुरु केली असून या अंतर्गत वाहनावर 630 एमव्हीए क्षमतेचे रोहीत्र उभारण्यात आले आहे. ज्या ठिकाणी वीज यंत्रणेत बिघाड आला, त्या ठिकाणी हे वाहन उभे करून तेथील नादुरुस्त रोहीत्रांवरील ग्राहकांच्या वीज जोडण्या वाहनावरील रोहीत्राला जोडण्यात येऊन तात्पुरत्या स्वरुपात वीजपुरवठा सुरु करण्यात येऊन ग्राहकांना दिलासा दिल्या जात आहे. यादरम्यान नादुरुस्त रोहीत्रातील बिघाड दुर करून अथवा नादुरुस्त रोहीत्र बदली करेपर्यंत ग्राहकांना या ‘पॉवर ऑन व्हील’ च्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येत आहे.
रोहित्र नादुरुस्त झाल्यावर त्याच्या दुरुस्ती किंवा बदलण्यासाठी साधारणपणे ३-४ तासाचा कालावधी लागतो. या काळात वीज ग्राहकांना वीजेसिवाय लागू नये यासाठी ‘पॉवर ऑन व्हील’ सोबतीला असल्याने रोहित्र बदलायचे काम सुरु असतांना ‘पॉवर ऑन व्हील’ च्या माध्यमातून ग्राहकांना वीज पुरवठा सुरु राहत असल्याने शहरातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून या सुविधेमुळे ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाणही कमी झाले आहे. राज्याचे ऊर्जा, नवीन व नीकरणीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नेहमीच वीज ग्राहकांना अखंडित आणि शाश्वत वीजपुरवठ्यासाठी आग्रही असतात, या अनुषंगाने पावसाळ्याच्या दिवसात वाढणा-या रोहीत्र नादुरुस्त होण्याच्या प्रमाणाचा फ़टका सर्वसामान्य वीज ग्राहकांना अधिक वेळ पडू नये यासाठी महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी ‘पॉवर ऑन व्हील’ चा उपक्रम राबविण्याबाबत केलेल्या सुचनेच्या अनुषंगाने नागपूर प्रविभागाचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या पुढाकाराने महावितरणच्या कॉग्रेसनगर विभागात ‘पॉवर ऑन व्हील’ चा उपक्रम यशस्वीरित्या सुरु झाल्याची माहीती, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी दिली असून विदर्भातील सर्व प्रमुख शहरांतून हा उपक्रम राबविण्याची तयारी महावितरणकडून करण्यात येत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.