Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जून १४, २०१८

अथक परिश्रमानंतर ४०० किलोचे आवाढव्य रोहित्र बसविण्यात महावितरणला यश

चंद्रपूर/प्रतिनिधी:
सध्या पावसाळा सुरु झाल्याने महावितरणच्या मागची डोकेदुखी अधिकच वाढली आहे.अश्यातच कमी वेळात बिघाड दुरुस्त करून वीज पुरवठा सुरळीत ठेवणे हे च्यालेन्जिंग काम करणे हि जबाबदारी महावितरणच्या प्रत्तेक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या खाद्यावर असते.अश्यात महावितरण नेहमी तत्पर असते, मंगळवारी मुल येथील विहीरगाव येथील वीजपुरवठा अचानक बंद झाला. महावितरणला त्याची तक्रार मिळाली,तक्रार प्राप्त होताच संपूर्ण अधिकारी व कर्मचारी बिघाळ दुरुस्तीचे काम करत होते मात्र तपासणी दरम्यान बिघाड मोठा असल्याचे आढळून आले.२०० किलोचे रोहित्र निकामी झाल्याने आता काय करायचे या प्रश्न महावितरणचे मुल शाखेचे सहायक अभियंता श्री.शशांक डगवार यांना पडला, फोन फानी करून रोहित्राची जुळवाजुळव करण्यात आली तितक्यात ४०० किलो वजनाचे रोहित्र मिळाले आणि २०० किलो वजनाच्या जागी ४०० किलो वजनाचे रोहित्र बसविण्याचे ठरविले २०० किलो वजनाचे रोहित्र काढून ४०० किलो वजनाचे रोहित्र कमी वेळेत लावणे म्हणजे जिकरीचेच काम होते, तिकडे कार्यालयात वीज पुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी फोन वरून येत होत्या, रोहित्र मिळताच तब्बल ८ तासांच्या अथक परीश्रमा नंतर मुल शाखेचे सहायक अभियंता श्री.शशांक डगवार यांना ते रोहित्र कनजस्टेड ठिकाणी लावण्यात यश आले.
आधीच दिवसभरात सकाळपासून वीजयंत्रणेतील मारेाडा येथील मोठा बिघाड दुरूस्त करणे,त्याच दिवशी बिघडलेले रोहित्र बसविणे,पुन्हा आठ तासांच्या परीश्रमानंतर ४०० किलोचे अवाढव्य रोहित्र बसविणे हे जिकरीचे काम करून ग्राहकांना वीज पूर्ववत करून दिले.
दिवसभर ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करणे व दिवसभर ब्रेकडाउन दुरूस्ती करत संध्याकाळी थकल्याभागल्यावरही अवघड , निसरडया जागेत व अरूंद जागी आठ तासाच्या अथक परिश्रमानंतर रोहित्र जागेवर बसविण्याचा आनंद मुल शाखेच्या सहाय्यक अभियंता श्री. शशांक डगवार, महेंद्र कांबळे, व सहकारी यांच्या चेहऱ्यावर घामाच्या रूपात ओसंडून वाहतांना बघायला मिळाला. दिवसरात्रीची तमा न बाळगाता कर्तव्य पार पाडतांना अनेक वेळा वाईट प्रसंगांना महावितरण विभागाला सामोरे जावे  लागते. परंतु महावितरणचे हे सच्चे सैनिक उन, वारा, पावसात ग्राहकांना सेवा देतांना भुक, तहान, थकवा विसरून काम करीत असतात. अश्या या  महावितरणच्या कर्मचाऱ्यान बद्दल नागरिकांनी सहनुभूतीपूर्ण वागने  आज गरजेचे आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.