Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जून १२, २०१८

तिरवंजाच्या विकासाकरिता निधीची कमतरता भासू देणार नाही:हंसराज अहिर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 खेड्यांचा विविध सोयी-सुविधांसह सर्वांगीण विकास हे केंद्र व राज्य सरकारचे अग्रक्रमावरील धोरण असून जिल्हîातील अनेक खेडी स्वयंपूर्णतेच्या दिशेने विकासाकडे वाटचाल करीत आहे. हा विकास सर्वसमावेशक व निरंतर सुरू राहिल अनु. जाती व नवबौध्द घटक वस्तीमधील विकास ही सरकारची जबाबदारी असून या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न सर्वत्रा होत आहे. तिरवंजा या गावाच्या विकासाकरिता निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी भद्रावती तालुक्यातील तिरवंजा (मो.) या गावात अनु. जाती व नवबौध्द घटक वस्तीतील विकास कामांच्या भुमीपुजन प्रसंगी केले.
दि. 11 जून रोजी तिरवंजा येथील सिमेंट काॅंक्रीट रस्त्याचे भुमिपुजन प्रसंगी ते बोलत होते. या भुमिपुजन कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, भद्रावती पं.स.च्या सभापती विद्याताई कांबळे, जि.प.चे सदस्य यशवंत वाघ, भाजपाचे जिल्हा महामंत्राी राहूल सराफ, पं.स.चे उपसभापती नागोबा बहादे, पं.स. सदस्या अश्विनीताई ताजणे, तिरवंजाच्या सरपंच सुंदराताई कुळमेथे, ग्रा.पं. सदस्य, सरलाताई कार्लेकर, भास्कर ताजणे, जि.प.चे माजी सदस्य विजय वानखेडे, पोलीस पाटील पिंगळे, लक्ष्मण पाटील येरगुडे, सहा. संवर्ग विकास अधिकारी गोडसेलवार यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
केंद्र व राज्य सरकारने ग्रामीण विकासाकरिता भरीव निधी उपलब्ध केलेला आहे. अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. खेड्यांच्या स्वयंपूर्णतेकरिता तसेच शेतकÚयांच्या आर्थिक उन्नतीसाठी अनेक योजना कार्यान्वित झाल्या असल्याने या योजनांचा लाभ आपसात समन्वय ठेवून नागरिकांनी गावाच्या विकासाला गती द्यावी असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्रयांनी केले. तिरवंजा येथे एटीएम आर.ओ. वाॅटर मशिन उपलब्ध केली जाईल तसेच प्रधानमंत्राी खनिज विकास निधी अंतर्गत 15 लक्ष रूपयांचा निधी गावांच्या विकासाकरिता उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे याप्रसंगी सांगितले. या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावू असे सांगतांना पाण्याच्या टाकीसाठी निधी उपलब्ध केला जाईल. यंदाच्या खरीप हंगामाच्या पाश्र्वभुमीवर केंद्र व राज्य सरकारने भरीव निधीची तरतूद केली आहे. डीएपी, युरिया व अन्य खते मुबलक प्रमाणात व वाजवी दरात उपलब्ध होतील असे नियोजन सरकारी पातळीवरून तसेच स्थानिय प्रशासकीय स्तरावरून करण्यात आल्याची माहिती मंत्राी महोदयांनी याप्रसंगी दिली.
सर्वांसाठी सरकार असून या सरकारच्या योजना या सर्वांसाठी आहेत मा. प्रधानमंत्राी नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण विकासात अग्रस्थानी ठेवत विकासाची दिशा निश्चित केली. राज्य सरकार खेड्यांच्या शाश्वत विकासासाठी विविधांगी योजनांद्वारे प्रयत्न करीत आहेत. आगामी काळात सर्व खेडी आर्थिक संपन्न होवून विविध सोयी-सुविधांयुक्त होतील असे सांगत या गावाच्या विकासाकरिता निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, खनिज विकास निधी अंतर्गत तालुक्यातील 70-80 गावात विकास कामे प्रस्तावित आहेत. चंद्रपूर महाऔष्णिक विद्यूत केंद्राच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त 52 गावांसाठी वेगळा निधी उपलब्ध केला जाईल असे आश्वासन ना. अहीर यांनी याप्रसंगी दिले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.