Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मे १०, २०१८

चंद्रपूर शहरात विना रोक-टोक जळतो उघड्यावर कचरा

राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाला केराची टोपली 
चंद्रपुर/ललित लांजेवार:
नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल (एन.जी.टी) व मुंबई उच्च न्यायालय यांचे उघड्यावर कचरा जाळता येणार नाही असे स्पष्ट निर्देश असतांना देखील चंद्रपूर शहरात उघड्यावर कचरा जाळला जात आहे.शुक्रवारी सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी यांच्या निवास स्थानकानजीक असलेल्या एका विद्युत डीपीच्या खाली उघड्यावर कचरा जळत होता.हि आग वाढत जाऊन तेथे असलेल्या विद्युत डीपीला लागली व हा प्रकार जिल्हा स्टेडीअम येथे जलविहार करण्यासाठी जाणाऱ्या काही नागरिकांना दिसला,त्यांनी तत्काळ या जळणाऱ्या कचऱ्यावर पाणी टाकून आग आटोक्यात आणली,व मोठा अनर्थ टळला.
चंद्रपूर शहरात असे अनेक ठिकाणे आहेत ज्याठिकाणी कचरा हा उघड्यावर जाळतांना दिसत आहे.असे हे दृश्य शहरात दररोज विविध ठिकाणी बघायला मिळत आहेत. झाडांचा पालापाचोळा जाळला जातो. झाडांचा पालापाचोळा जाळण्यास मनाई करण्यात आली असून हा पालापाचोळा खत तयार करण्यासाठी वापर व्हावा, असे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. परंतु स्वच्छ चंद्रपूर-सुंदर चंद्रपूराचा विळा उचललेल्या चंद्रपुरात अद्यापही हरित लवादाच्या निर्णयाचे पालन होत नसल्याचे वास्तव ह्या संपूर्ण प्रकारावरून दिसून येत आहे.
संपूर्ण जगात ग्लोबल वॉर्मिंगची समस्या उद्भवली असतांना पर्यावरणाची सुरक्षा व प्रदूषणाचा मुद्दा अतिशय महत्वाचा बनला आहे.ज्यात उघड्यावर कचरा जाळल्याने पर्यावरणास हानी पोहचते, ज्यामुळे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल (एन.जी.टी) व मुंबई उच्च न्यायालयाने उघड्यावर कचरा जाळण्यास मनाई केली आहे. असा जर प्रकार शहराच्या ठिकाणी होत असेल तर जिल्हा प्रशासन व पालिका प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. सर्व असतांना देखील उघड्यावर कचरा जाळण्यास रोक लावणाऱ्यास संबंधित विभाग कमी पडत असल्याचे दृश्य सध्या चंद्रपुरात दिसू लागले आहे.
वर्धमान कौशिक आणि संजय कुलक्षेत्र यांनी युनियन आॅफ इंडिया व इतर यांच्याविरुद्ध दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर केलेल्या याचिका क्र. २४ /२०१४ नुसार मे २०१५ मध्ये दिलेल्या निकालानुसार झाडांचा पालापाचोळा जाळण्यास सक्त मनाई आहे. तसेच जंगल शेजारी असलेल्या विटभट्टी, शेतातील काडीकचरा, फॅक्टरी आदींवर आगीसंदर्भात निर्बंध लादण्यात आले आहे. हा निर्णय राज्यातील २९ महापालिका, ३५३ नगरपरिषद, नगरपालिकांना तसेच ४४ हजार गावांमध्ये लागू करण्यात आला आहे. झाडांचा पालापाचोळा जाळल्यानंतर होणारे नुकसान हे गंभीर असल्याचे राष्ट्रीत हरित लवादाने निकालात म्हटले आहे.
यासंबंधी कायद्यात काय तरतुदी आहेत, उघड्यावर कचरा पेटविणे हा पर्यावरण विषयक कायदे आणि भारतीय दंड विधानानुसारही गुन्हा आहे. जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकांना यावर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. राष्ट्रीय हरित लवादाने २०१५ मध्ये दिलेल्या एका निकालात उघड्यावर कचरा पेटविणाऱ्याला पाच हजार रुपये दंड करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर १३ जून २०१६ रोजी दिलेल्या सुधारित आदेशात हा दंड एक लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे. हवा प्रदूषण होते म्हणून पर्यावरण कायद्यानुसार हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. याशिवाय भारतीय दंड विधानातील कलम २७८ नुसार धोकादायक कृत्य म्हणूनही हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. 
याशिवाय उपद्रवी कृत्य म्हणून कलम २६८, पाण्याजवळ कचरा पेटविला असेल तर कलम २७७ तसेच कलम २६९ नुसारसुद्धा कचरा पेटविणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते. कचरा कोणी पेटविला याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करायची आहे. याशिवाय ज्यांच्या आवारात कचरा पेटविण्यात आल्याचे आढळून आले, त्यांनाही यासाठी जबाबदार धरण्याची कायद्यात तरतुद आहे.असे असले तरी शहरात मात्र अशा स्वरूपाची कारवाई होताना दिसत नाही.निष्काळजीपणामुळे अश्या घटना ह्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालू शकते.अश्या प्रकारे उघड्यावर कचरा जाळणाऱ्या संबंधितांचा शोध घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे.व भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून कर्मचारी आणि नागरिकांचे प्रबोधन करणे आज गरजेचे आहे . या संपूर्ण प्रकाराबाबाद संबंधित अधिकारी व नगरसेवकांशी बोलेले असता या बाबाद कोणतीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
महावितरण देणार पत्र:
या संपूर्ण प्रकाराबाबाद महावितरनच्या अधिकाऱ्यांना विचारले असता,चौकशी करून तपासणी करण्यात येईल व तसे आढळल्यास महानगर पालिकेला पत्राच्या माध्यमातून कळविण्यात येनार असल्याचे सांगितले व त्यानंतरही असा प्रकार होत असेल तर कारवाई करण्यात येईल.असे महावितरनच्या अधिकाऱ्यानी सांगितले. 


जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध) 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.