Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे १५, २०१८

शेतकरी पुत्र बनला विक्रीकर अधिकारी

वरोरा/प्रतिनिधी:
Sales Tax Officer | शेतकऱ्याचा मुलगा झाला विक्रीकर अधिकारी
शिक्षण घेत असतानाच घरच्या शेतीकामात मदत करून शिक्षणाची जिद्द सोडली नाही. लहानपणापासूनच जिद्दी स्वभाव असल्याने विनोद विदुम भोयर या भूमिपुत्राने पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होवून मुलगा विक्रीकर अधिकारीपदासाठी पात्र ठरला़. 
वरोरा तालुक्यातील आबवडगाव येथील विनोद भोयर याने वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर साखरा येथील किसान विद्यालयातून दहावी झाला़ या कालखंडात विनोदला वडगाव ते साखरा येथून पायी जावे लागत होते़ १२ वीपर्यंतचे शिक्षण बोथली येथील भिवाजी वरभे कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण केल़ दरम्यान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून बी.ए.ची पदवी घेतली. पदवी घेत असताना ग्रामीण भागात राहूनच स्पर्धा परिक्षेची तयारी सुरू केली़ वडगावसारख्या ठिकाणी ग्रंथालयाची सुविधा नाही़ स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन मिळणे कठीणच होते़ अशा प्रतिकुल परिस्थितीमध्ये विनोदने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. वडील व भाऊ शेती करतात. भोयर कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून असल्याने संपूर्ण कुटुंब शेतात राबते़ विनोदने शेतीला हातभार लावून अभ्यासाला नियमित वेळ देत होता़ परिस्थिती नसताना त्याने यशाचे शिखर गाठून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. गाव व परिस्थिती कशीही असो़ मनात खुणगाठ बांधल्यास यश संपादन करता येते, हे विनोद भोयर या तरुणाने दाखवून दिले आहे. विनोदन केवळ भाषा विषयाची खासगी शिकवणी लावली होती़ आईवडील, भाऊ, शिक्षक, मित्रांना मार्गदर्शन केल्याने यश मिळाले़ यापुढे उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न मनात ठेवून विनोदने तयारी सुरू केली आहे.
                                     ----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

-------------------------------------------------------------------------
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 


कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.