Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे २३, २०१८

गंजवार्ड येथे पाणपोईचे उद्घाटन


चंद्रपूर- चंद्रपुरचे तापमान हे देशात पहिल्या क्रमांकाचे आहे. अती उष्ण जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. उष्णता असल्याने शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. येथील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय येथील मेक्यानिकल शाखा व राईसन शाईन क्लब यांच्या तर्फे चंद्रपूर शहरातील गंजवार्ड, चंद्रपूर येथे पाणपोई चालू करण्यात आली. या पाणपोई चे उद्घाटन डॉ. विनोद गोरंटीवार, प्रल्हाद चंदेल यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉ. गोरंटीवार यांनी उपस्थित नागरिकांना पाण्याचे महत्व पटऊन सांगितले. जल हि जीवन है. पाण्याची बचत करा व पाण्याविना कोणाचा जीव जाऊ नये म्हणून आपण फक्त गंजवार्ड इथेच पाणपोई चालू न करता संपूर्ण शहरात पाणपोई चालू करून जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून ध्या आणि आपल्या या सामाजिक कार्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. याप्रसंगी राईसन शाईन क्लबचे अध्यक्ष पंकज चिमूरकर, सोहेल पठान, मोहित रामटेके, संघर्ष रत्नपारखी, निखील राजपूत, हेमंत पाकेवार, संकेत राउत, प्रणव दळने, अंकेश कोकुलवार, अमित राठोड, शुभम करमरकर, निलेश धामनगे, भावना चांदेकर, राणी चौधरी यांची उपस्थिती होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.