Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे १६, २०१८

चंद्रपूर जिल्ह्यातील ४ विध्यार्थ्यांनी गाठले माउंट एव्हरेस्ट

नागपूर प्रतिनिधी:
आदिवासी विकास विभागात 'आकांक्षापुढे जिथे गगन ठेंगणे' या काव्य ओळींची आठवण यावी असे धाडस करण्यात  चार आदिवासी विद्यार्थी यशस्वी ठरले. जगातील गिर्यारोहकांना भुरळ पाडणारा माउंट एव्हरेस्ट सर करण्यात मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे हे यशस्वी ठरले आहेत.
एकात्मिक आदिवासी प्रकल्प चंद्रपुर, जिल्हा प्रशासन चंद्रपुर आणि आदिवासी विकास विभागाने आदिवासी विद्यार्थ्यांतील नैसर्गिक काटक व धाडसीपणाला साद घालत मिशन शौर्यची आखणी केली. प्रधानसचिव मनिषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा वेगळा उपक्रम पहिल्यांदाच विभागातर्फे राबविण्यात आला.
मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे, आकाश मडवी, आकाश अत्राम, शुभम पेंदोर, विकास सोयाम, इंदू कन्नाके, छाया आत्राम हे सर्व चंद्रपूर जिल्ह्यातील बोरडा, देवडा जिवती ब्लॉक्स मधील आदिवासी कुटुंबांतील मुले-मुली आदिवासी विकास विभागाच्या वतीने गेल्या महिन्यात मिशन शौर्यवर निघाले होते.जुलै 2017 पासून या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सुरु झाले. दार्जिलींग, लेह-लडाख या ठिकाणी या मुलांना गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देण्यात आले. गेल्या महिन्यात 11 एप्रिल रोजी हे विद्यार्थी मुबंईवरुन काठमांडुला रवाना झाले होते.
मोहिमेवर जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागरराव यांच्यासह आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांनी या विद्यार्थ्यांना भेटून प्रेरणात्मक शुभेच्छा दिल्या होत्या. या मोहिमेच्या या अंतिम टप्प्यासाठी त्यांच्याबरोबर सपोर्ट स्टाफ व व्यवस्थापकांबरोबरच 15 शेरपा, एक हाय अल्टीट्युड तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते. या मोहिमेतील अन्य विकास सोयाम व इंदु कन्हाके हे ही लवकरच लक्ष्य गाठतील व अन्य विद्यार्थ्यांची चढाई सुरू असुन लवकरच तेही एव्हरेस्ट सर करतील.
मिशन शौर्य हा उपक्रम अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आदिवासी विकास विभाग व चंद्रपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला असून या विद्यार्थ्यांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांनी चंद्रपूरात आयोजित कार्यक्रमात हिरवी झेंडी दाखवत शुभेच्छा दिल्या. या 10 विद्यार्थ्यांपैकी आणखी 2 विद्यार्थी येत्या 2 दिवसात माऊंट एव्हरेस्ट सर करतील. या धाडसी, शूर, देशभक्त विद्यार्थ्यांचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.
आदिवासी विकास विभागाच्या इतिहासातील हा सोनेरी क्षण-विष्णु सवरा
आदिवासी विकास विभागाच्या वतीने मिशन शौर्य या मोहिमेत भारताचा झेंडा एव्हरेस्टवर लावण्यात आदिवासी विद्यार्थी विद्यार्थीनी यशस्वी ठरले आहेत. आदिवासी विकास विभागाच्या इतिहासातील हा सोनेरी क्षण असल्याचे मंत्री विष्णुग सवरा यांनी सांगितले. या चारही जणांचे अभिनंदन सावरा यांनी केले.तर विभागातर्फे राबविण्यात आलेला हे पहिलेच धाडसी मिशन होते, यामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे नक्कीच प्रेरणादायी आहे. भविष्यातही आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतील. मिशन शौर्यशी निगडीत प्रत्येकाचे हे यश असल्याचे आदिवासी विकास विभागाच्या प्रधानसचिव मनिषा वर्मा यांनी सांगितले.
                                   -----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.