चंद्रपूर/प्रतिनिधी:
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या127 व्या जयंती निमित्त चंद्रपुर शहरात असणाऱ्या पूर्णाकृती पुतळ्याला हजारो भीम सैनिकांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. सोबतच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, पोलीस अधीक्षक नियती ठाकर,अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत,मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक, डॉ बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव समिती चे अध्यक्ष प्रवीण खोब्रागडे सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी सर्व मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पमाला अर्पण केली.बाबासाहेबांच्या महान कार्याचा पुनरूच्चार करीत भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून वैश्विक किर्तीची प्रबळ लोकशाही दिली. समता, बंधुत्व व समान न्यायाचे तत्व दिले. समतेच्या या महासागराने समाजातील दिनदुबळ्यांना सन्मानाने जगण्याचा मुलमंत्रा दिला. त्यामुळे या महामानवाचे या देशातील नागरीकांवर फार मोठे ऋण आहेत. त्यांच्या ज्ञान व विचार कणांचा, अंगिकार करून, राष्ट्राच्या, समाजाच्या उत्कर्षासाठी झटतांनाच राष्ट्रहिताच्या कार्यास झोकुन देत कर्तव्य बजावले. तरच या बोधिसत्वास खरी आदरांजली ठरेल असे मान्यवरांनी मत व्यक्त केले.सामूहिक बुद्धवंदना कार्यक्रमात सहभागी प्रमुख मान्यवरांनी डाॅ.आंबेडकरांच्या जीवनावर त्यांचा महानत्तम कार्यावर प्रकाश टाकुन त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.