नागपूर/विशेष प्रतिनिधी:
दिवसेंदिवस मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष वाढतच चालला असून अश्यातच हिंगणा मार्ग सीआरपीएफ गेट जवळील लता मंगेशकर रुग्णालय परीसरातील पोलिस नगरात एक पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरात अचानक बिबिट शिरल्याने परीसरत चांगलीच खळबळ उडाली आहे . हिंगणा येथील काही भाग झुडपी जंगलाला लागून असून या ठिकाणी बिबट्याचे वास्तव्य आहे.सध्या उन्हाळा सुरु असल्याने पाणी आणि शिकारीच्या शोधात हा बिबट वस्तीत शिरला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाला पाचारण करण्यात आले असून हा बिबटया सध्या बाथरूममध्ये शिरला आहे. प्राप्त माहिती नुसार, रविवार (१५ एप्रिल) रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास एक तरुण घरातील शौचालयात गेला होता. त्याला घराच्या छतावर बिबट्या बसलेला दिसला.तरुणाचा आवाज ऐकताच बिबट्या शेजारच्या ए. जी. बायस्कर यांच्या घरात घुसला.
तरुणाने लगेच बिबट्या घरात घुसल्याची माहिती वनविभाग व पोलिसांना दिली तसेच बायसकर यांना सतर्क केले. बिबट्या घरात घुसल्याची बातमी ऐकून बायस्कर आपल्या परिवारासह घराबाहेर पडले.
घटनास्थळी वनाधिकारी व पोलिसांचा ताफा पोहचला दुपारपर्यंत पोलिस व वनविभागाचे ऑपरेशन बिबट्या सुरुच होते. याला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.वाघ वस्तीत शिरला असल्याची माहिती परिसरात मिळताच त्या परिसरात चांगलाच जमवळा जमला होता.