Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी ०१, २०१८

मित्रानेच केला मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार: ताडोबातील MTDC च्या रेस्टहाऊसमधील घटना

चंद्रपूर/प्रतीनिधी:
ps-durgapur-749
ताडोबामध्ये व्याघ्रदर्शनासाठी सोबत आलेल्या 21 वर्षीय मैत्रिणीवर चाकूचा धाक दाखवून सलग लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घटनेच्या १५ दिवसानंतर  बुधवारी उघडकीस आली. 
 17 जानेवारी रोजी ताडोबाचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या मोहुर्ली येथील MTDC च्या रेस्टहाऊसमध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी दुर्गापूर पोलीस ठाण्यात  पीडीतेच्या तक्रारीवरून आरोपी मित्र शुभम काळबेंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून सध्यातरी आरोपीला अटक करण्यात आली नसल्याचे सांगण्यात यात आहे .आरोपी व त्याची २१ वर्षीय मैत्रीन हे दोघेही १७ जानेवारीला ताडोबा भ्रमंती करण्यासाठी आले होते.ते MTDC च्या रेस्टहाऊसमध्ये थांबले होते. दुपारी जेवण केल्यानंतर तो मैत्रिणीसह खोली क्रमांक १०१ मध्ये गेला या नंतर त्याने तिच्यावर चाकूचा धाक दाखावत अत्याचार केला. रात्रभर दोघेही तेथेच थांबले होते रात्रीही त्याने चाकूचा धाक दाखवीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या संपूर्ण प्रकरणाचा विडीओ त्याने केला होता .18 जानेवारी रोजी दोघेही जेवण करून नागपूरला निघुन गेले दरम्यान त्याने पीडित मुलीला आपल्या सोबत लग्न करण्याचा अट्टाहास केला.  मात्र तिने नकार दिल्याने त्याने अश्लील चित्रफीत व्हायरल केली.  यावरून संपूर्ण घटनेचे बिंग फुटले.  घटनेच्या पंधरा दिवसांनी म्हणजेच बुधवारी पीडित युवतीने दुर्गापूर पोलिस ठाणे गाठून आरोपी शुभम काळबेंडे विरुद्ध तक्रार केली ,दुर्गापूर पोलिसांनी या प्रकरणी शुभम काळबेंडे यांचेवर कलम ३७६ (अ ) अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.