Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी १५, २०१८

गोंडखैरी येथे शहिद चेतन साळवेला श्रध्दांजली...!

आमच्या विद्यार्थांचा आम्हाला अभिमान..! प्रा.सुरेश बावणकर..!

बाजारगाव-(दि.१५/फेब्रुवारी) गोंडखैरीः स्थानीक नव भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात गावाचा सुपुत्र वीर चेतन विनायक साळवे याला राज्य राखीव पोलीस दल व गावक-यांच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.          राज्य राखीव व पोलीस दलाच्या गट क्रंमाक १५ गोंदिया कँम्प मध्ये कार्यरत चेतन ला गडचिरोली जिल्हातील येरकड तालुका धानोरा येथे १५/सप्टेंबर २०१४ ला जहाल नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात वीर मरण आले होते. आपले जीवन देशाच्या कामी अर्पण करणाऱ्या वीर शहिदांचे कार्य व त्यांच्या लौकिक युवा पिढी पर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने शहिदांचे गावात त्यांनी शिक्षण घेतलेल्या शाळांमध्ये जाऊन राज्य राखीव पोलीस दलातर्फे त्यांना श्रध्दांजली वाहण्याचे ध्येय ठरविण्यात आले आहे. त्याचा भाग म्हणून गोंडखैरी चे रहवासी(आई) संगीता व (वडील) विनायक साळवे त्यांच्या पोटी २/नोव्हेंबर १९९० ला जन्मलेल्या चेतन ला त्याने शिक्षण घेतलेल्या नवभारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात श्रध्दांजली पर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
         यावेळी बोलतांना सहायक समादेशक आरके बहाळे यांनी चेतनचे वीरमरण आम्हच्या जवानांच्या मनात सदैव क्रांतीची ज्योत तेवत ठेविल अशा शब्दांत चेतनला श्रध्दांजली दिली.या कार्यक्रमाचे आयोजन राज्य राखीव दलाचे समादेशक जावेद अनवर यांचे नेतृत्वात सहायक समादेशक आरके बहाळे,पोलीस निरिक्षक ऊपाध्याय,ऊपनिरिक्षक नितीन सानप,तायडे आणि त्यांचे सहकारी पवार,खोकले,ठाकरे,कटरे,भाटिया यांनी केले.
     यावेळी नवभारत विद्यालयाचे प्राचार्य सुरेश बावणकर,सरपंच चांगदेव कुबडे,शहिद पिता विनायक साळवे,त्याची आई संगीता साळवे,भाऊ हर्षल साळवे  व वहिनी रंजना साळवे हे प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन पर्यवेक्षक कल्पना ऊंदिरवाडे यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी माधव कांबळेसर,प्रा.नामदेव मोरे,राहूल हेलोंडे,कुबडे,वरखडे,राऊत,चारथळ व नागरिकांनी सहकार्य केले.
फोटो...!

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.