Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी १८, २०१८

बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी

नागपूर- जिल्ह्यासह राज्यभरात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे.परंतु बोंडअळी च्या प्रादूरभावामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या उत्पन्नामध्ये मोठी घट दिसून येत आहे.त्यामुळे राज्यशासनाच्या शितकालीन सत्रात बोंडअळी आली कशी ? व त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यावर चर्चा करून शेतकऱ्यांना शासनाने मदत जाहीर केली.परंतु प्रशासनाच्या माध्यामातून जे सर्वेक्षणाचे कार्य होत आहे ते कोठेतरी चुकत आहे असे मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.मुख्यत्वे करून कळमेश्वर ,सावनेर, काटोल, नरखेड च्या परिसरात बोंडअळी चा सर्वे बरोबर झाला नसून, शेतकऱ्यानमध्ये असंतोष पसरलेला आहे.करिता नागपूर जिल्हा भाजपच्या वतीने बोंडअळी बाबत पुनः सर्वेक्षणाची व शेतकऱ्यांना ज्यास्तीत ज्यास्त मदत मिळून देण्याची मागणी शासनाला नागपूर जिल्हा भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.

नागपूर जिह्यातील कळमेश्वर,सावनेर,काटोल,व नरखेड तालुक्यात दिनाक ११,१२,१३ फेब्रुवारी ला नैसर्गिक आपत्ती येऊन अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे त्यामध्ये गहू,हरबरा, संत्रा ,केळी,मौसंबी ,भाजीपाला व फुलबागांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.त्यामुळे शेतकरी कोसळून गेलेला आहे. मा.ना.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे पालकमंत्री नागपूर जिल्हा यांच्या सोबत आम्ही गारपीट ग्रस्त भागाची पाहणी केली.शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू त्यांच्या भावना व विरोधकांनी शासनावर केलेले आरोप व त्यामुळे विरोधकांनी शेतकऱ्यांमध्ये पसरविलेला असंतोष बघून आम्ही नागपूर जिल्हा भाजपच्या वतीने मा.ना.श्री.देवेन्द्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच मा.ना.श्री. भाऊसाहेब फुंडकर कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य व मा.ना.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे पालकमंत्री नागपूर जिल्हा यांना नम्र विनंती करितो कि,बोंडअळी चे पुनः सर्वेक्षण काटोल ,कळमेश्वर,सावनेर,नरखेड या तालुक्यात करावे व गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने ज्यास्तीत ज्यास्त मदत मिळून द्यावी.
दिनाक.१७.०२.१८ ला काटोल तालुक्यातील इसापूर या गावातील प्रल्हाद धोटे या गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ही अतिशय खेदाची बाब आहे माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे कि अश्या प्रकारे खचून जाऊ नका व आत्महत्या करू नका .शासनाच्या वतीने लवकरच गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा मला विश्वास आहे.शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.तसेच सर्व राजकीय व शेतकरी संघटनांनी या विपरीत परिस्थितीत,आंदोलनात्मक पवित्रा न घेता शासनाच्या माध्यमातून ज्यास्तीत ज्यास्त मदत मिळविण्यासाठी चर्चेच्या माध्यमातून सहकार्य करावे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.