नागपूर - कविवर्य वि वा शिरवाडकरांचा म्हणजेच कुसुमाग्रजांचा जन्मदिन दरवर्षी 'जागतिक मराठी भाषा दिन 'म्हणून साजरा करण्यात येतो .या निमित्ताने कुसुमाग्रजांच्या कविता व गीतांवर आधारित ' रसयात्रा ' हा दर्जेदार मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम मंगळवार ,दिनांक २७ फेब्रुवारी २०१८ ला संध्याकाळी ठीक ५ वाजता पी एम जी सभागृह,माधवनगर,नागपूर येथे संगीत संस्था सुरसप्तक व महिला प्रबोधन मंडळ ,माधवनगर ,नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमास जेष्ठ साहित्यिक व निवृत्त प्राचार्य मा.डॉ.नलिनीताई वह्राडपांडे या प्रमुख अतिथी राहणार आहेत .तसेच आघाडीच्या लेखिका-कवयित्री मा, वर्षा किडे-कुळकर्णी यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात येणार आहे .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पद्मजा सिन्हा व निवेदन किशोर गलांडे करतील.वीणा कुळकर्णी व उर्मिला राजदेरकर या काव्यवाचन तसेच सुचित्रा कातरकर, मुकुल पांडे ,पद्मजा सिन्हा,अश्विनी लुले,प्रतीक्षा पट्टलवार,ऋचा येनूरकर ,संगीता भगत, दीपाली सप्रे,दीपाली पाणके ,विजय देशपांडे,डॉ.अमोल कुळकर्णी ,अरुण ओझरकर ,अपूर्व मासोदकर,आशिष घाटे ,मोहन पांडे,हे गायक कलाकार गीते सादर करतील .विजय देशपांडे,परिमल जोशी ,अनिकेत,रवी सातफळे,तुषार विघ्ने, आशिष घाटे ही वादक मंडळी साथसंगत करणार आहेत. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
गुरुवार, फेब्रुवारी २२, २०१८
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
विजेचे बिल चेकद्वारे भरता का? मग ही काळजी नक्की घ्या! Electricity Bill (adsbygoogle = window.adsbygoogle || [])
राष्ट्रवादी काँग्रेसने मागितल्या चंद्रपूर जिल्ह्यातील या दोन जागा NCP Chandrapurराष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक श्री.दिलीप प
तरुणीसह चार मित्रांचा नदी पात्रात बुडून मृत्यू । Four Drowned In Riverतरुणीसह चार मित्रांचा नदी पात्रात बुडून मृत्यू ।
वन नेशन वन इलेक्शन : चर्चेतून झाले श्रोत्यांच्या शंकांचे निरसनवन नेशन; वन इलेक्शन संकल्पना योग्य नाही : ॲड. फिर
शेकडो शिक्षकांना या निर्णयाचा होणार फायदा | teacher Maharashtra Shikshak शेकडो शिक्षकांना अतिरिक्त होण्यापासून मिळाला दिला
त्या अपघातातील जखमी पत्रकाराचे निधन sunil somkuvar🕯️ *निधन वार्ता* 🕯️ (adsbygoogle
- Blog Comments
- Facebook Comments