Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी १६, २०१८

उपअभियंता व कर निरीक्षक यांना लाच घेताना पकडले

कळमेश्वर पालिकेत लाच लाचलुचपत विभागाची कारवाई
                            

कळमेश्वर_ कळमेश्वर -ब्राह्मणी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता प्रणित बुरांडे व लेखापाल तथा करविभाग प्रमुख सुनील चौधरी यांना अनुक्रमे ८ हजार रुपये व  ३हजार रुपये नगदी लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक फाल्गुन घोडमारे ,उपनिरीक्षक परशराम शाही यांनी आज १६फर रोजी दुपारी १ वाजता पालिकेच्या कार्यालयातच सापळा रचून रंगेहात पकडले त्यामुळे नगरपालिका कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांच्यात एकच खळबळ उडाली. हकिकत अशी की फिर्यादी कंत्राटदाराने पालिकेकडे हायमास्ट विधुत पोल उभ्या करण्यासंबंधित प्रलंबित देयकाची अनेक महिन्यापासून मागणी करीत होते. हे देयक काढण्यासाठी या २अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राट दाराला रकमेची मागणी केली होती. फिर्यादीने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. त्या आधारे आज पालिका कार्यालयातच लाचलुचपत विभागाचे अधिकारी दबा धरून बसले होते. या दोन अधिकाऱ्यांना एकूण ११ हजारांची रक्कम हातात देताच त्यांनी आरोपींना आपल्या ताब्यात घेतले. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ कलम ७ (१३) ,१(ड) ,सहकलम १३ (२) , नुसार आरोपींना अटक करण्यात आली.                                    हि कारवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पी आय फाल्गुन घोडमारे , परशराम शाही ,गजानन गाडगे ,रविकांत डहात ,मनोज कारणकर आदींनी पार पाडली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.