मानव वाघ संघर्ष सुरूच
चंद्रपूर/ललित लांजेवार
मानव वाघ संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.चंद्रपूर शहरालगत लागून असेलल्या चंद्रपूर परिक्षेत्रातील एपीजे अब्दुल कलाम बगीच्याच्या मागील बाजूला सोमवारी सकाळी मंजुळा केराम वय (३५ वर्षे) याच्यावर वाघाने हल्ला केला या हल्यात त्या जागीच ठार झाल्या. एपीजे अब्दुल कलाम बगीच्याच्या मागील बाजूस कंपाउंड नंबर 484 येथे हा अमृतदेह आढळून आल्याने परिसरात चांगलीच खडबड उडाली.हा मृतदेह याच परिसरातील हिंग्लज भवानी वार्डात राहणाऱ्या महिलेचा असल्याचे सांगितल्या जात आहे. सोमवार सकाळी लाकूड गोळा करण्यासाठी सदर महिला गेली असता वाघाने मागून तिच्यावर हमला केला. या हल्यात महिला जागीच ठार झाली आहे.हा परिसराला जुनोना जंगल लागून असल्याने इथे मागील 5,ते 6 दिवसापासून वाघ फिरत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.मिळालेल्या माहिती वरून वनविभागाचे अधिकारी व स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरु असल्याचे सांगितले जात आहे.नुकताच उन्हाळा सुरु झाला आहे.त्यामुळे शिकार आणि पाण्याच्या शोधात वाघ सर्वत्र फिरत असतो,त्यामुळे अश्यावेळी माणसाचे जंगलात जाणे म्हणजे मुठीत जीव घेऊन सरपण आजम करणे असेच आहे,या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
