Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी २७, २०१८

उपाध्यक्षपदाचा वाद चिघळला;बजेट सभेवर सत्ताधारी नगरसेवकांचा बहिष्कार

अध्यक्षांनी केली सभा रद्द ;वर्षभराचा कालावधी होवूनही राजीनामा न दिल्याने वादंग
रामटेक तालुका प्रतिनिधी:

रामटेक  नगरपालीकेत सत्ताधारी भाजपाचे नगरसेवकांनी दिनांक  27 फेब्रु 2018 रोजी नगरपालीकेच्या बजेट मीटिंगला या अनुपस्थित राहून घरचा अहेर दिल्याने रामटेकच्या राजकीय वर्तुळात प्रचंड  खळबळ उडाली.
दुसरीकडे भाजपाचे नगरसेवक रामटेक शहराच्या विकासाच्या आगामी नियोजनाच्या सभेला अनुपस्थित राहीले यामागे नेमके काय कारण आहे व त्यासाठी कोण जबाबदार आहे याचीही यानिमीत्ताने शहरांत चर्चा होत आहे.सत्ताधारी 13 पैकी  उपाध्यक्ष असलेल्या सौ कविता मुलमुले व सौ पद्मा ठेंगरे  याच उपस्थित होत्या. 
अन्य 11 नगरसेवक उपस्थित नसल्याने नगराध्यक्षांनी ही सभाच रद्द केली. याबाबत सविस्तर वृत्त असे की रामटेक नगरपालीकेत भाजपाचे 17 पैकी 13 नगरसेवक निवडून आले आहेत. यापैकी सौ कविता मुलमुले यांना उपाध्यक्ष करण्यात आले आहे.उपाध्यक्ष करते वेळी  दरवर्षी एका महीला नगरसेविकेला उपाध्यक्ष करण्यात येईल असे त्यांनी आपसांत ठरविले होते.याबाबत रामटेकचे आमदार डी.मल्लिकार्जुन  रेड्डी व नागपुर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष राजीव पोतदार या दोन महत्वपूर्ण  नेत्यांच्या उपस्थितीत उपरोक्त विषय  ठरला तरीही उपाध्यक्षा कविता मुलमुले या राजीनामा देत नसल्यामुळे सर्व च नगरसेवकांमध्ये नाराजी आहे.
या सर्व नगरसेवकानी जिल्हाध्यक्ष पोतदार यांची भेट घेतली मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही त्यामुळे या नगरसेवकांनी नगरपालीकेच्या कामकाजावर बहिष्कार  टाकल्याचे चित्र यानिमीत्ताने दिसून येत आहे.आपले नांव न छापण्याच्या अटीवर अनेक नगरसेवकांनी सांगीतले की,दरवर्षी  उपाध्यक्ष बदलला जाईल असे पक्षांतर्गत ठरले  असतांना तसे न झाल्याने नगरसेवक नाराज आहेत.शिवाय या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वेळ लागत असल्याने जोपर्यंत उपाध्यक्षा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत नगरपालीकेच्या कामकाजात सहभागी व्हायचे नाही असा निर्णय या नगरसेवकांनी घेतला आहे.उपरोक्त पार्ष्वभूमीवर पुढे  काय होते याकडे रामटेक वासीयांचे लक्ष लागले  आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.