चंद्रपुर/प्रतिनिधी:
शहरातील विट्ठल मंदिर ते पठानपुरा रोड वरील भागात काल रात्री १० ते १२ वाजता च्या सुमारास एक माकडाने नागरिकांना जखमी केले. यात देशराज गिरडकर आणि अजय सातोकर यांना रात्रीच्या वेळेस जखमी केले. रात्रीच्या वेळेस माकडाचा वस्तीत या घरावरुन त्या घरावर उड़्या मारत घराबाहेर येणाऱ्या किंवा बाहेरून येणाऱ्या नागरिकावर हल्ला चढवत होता. सदर परिसरात इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे घर असल्याने त्यानी नागरिकांना आप आपल्या घरी शांत राहण्यास आणि बाहेर न येण्याचे आवाहन केले.
मात्र, सकाळ होताच याच परिसरात नितिन बोडखे, वय ४० यास मागुन डोक्यावर चावा घेतला. यास ६ टाके पडले, लगेच दुसऱ्या दिशेला अजय रामेडवार, वय ४० यास मागून हाताला आणि पाठीला चावा घेतल्याने त्यास २२ टाके पडले. नंतर अलका खनके, वय ३५ याच्या हाताला चावा घेतला त्यांना ९ टाके पडले, कल्पना रागिट, वय ४० यांच्या डोक्याला आणि पाठीला चावा घेऊन जखमी केले. आकाश बेले या युवकांच्या मागे धावून त्यास पाठीवर चावा घेत जखमी केले।
परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होऊन लोकानी आप आपली दारे खिडक्या लावून घेतली. उत्साही युवक लाठी काटया घेऊन रस्तावर आले. घटनेची माहिती बंडू धोतरे यांना देण्यात आली.जवळच विठोबा खिड़की येथे इको-प्रो चे किल्ला स्वच्छता अभियान सुरु होते, तिथुन सर्व इको-प्रो टीम घटनास्थळीं त्वरित पोहचली। जखमीची माहिती घेत, परिस्थिति समजून आजु बाजूचे रस्ते बंद केले. घटनास्थळ वरुन नागरिकांचा जमाव दूर करण्यात आले. नागरिकांना घरी राहण्याचे सांगून, शांतता राखण्यास विनंती करण्यात आली. परिस्थितीचा गंभीरता पाहून वनपरिक्षेत्र अधिकारी श्री थिपे यांना माहिती दिली, वनविभाग ची बेशुद्ध करणारी रैपिड यूनिट बोलविण्यात आली.
त्यांनतर वनविभाग आणि इको-प्रो टीम ने या परिस्थितीत सदर ऑपरेशन यशस्वीरीत्या राबवून माकड़ास बेशुद्ध करून यशस्वी रित्या जेरबंद केले। माकड जेरबंद होताच नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला, काल पासून असलेले भीतीचे वातावरण दूर झाले। या कार्यात बंडू धोत्रे, मानद वन्यजीव रक्षक, वनविभागाचे डॉ कुंदन पोड्शलवार, पशुवैद्यकीय अधिकारी, टीटीसी, मिलिंद किटे, वनरक्षक शूटर, अतीक बेग, वनरक्षक शूटर, नितिन बुरडकर, इको-प्रो वन्यजीव विभाग प्रमुख, राजू बढ़केलवार, वनपाल, दादाराव मेश्राम, वनपाल, भुलेश रंगारी वनरक्षक, किशोर डागे, वनमजुर, उमेश घनोडे, इको-प्रो चे सदस्य बिमल शहा, राजू कहिलकार, धर्मेंद्र लुनावत, अनिल अङ्गुरवार, हरिदास कोराम, विशाल रामेडवार, हरीश मेश्राम, रोशन धोतरे, रविंद्र गुरनुले, कपिल चौधरी, वैभव मड़ावी, अतुल राखुंडे यांनी सहकार्य केले.