Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी २३, २०१८

सावित्रीबाई फुले महाविद्यालात ‘आनंद मेळावा’

गडचांदूर/प्रतिनिधी:
 सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालयात सांस्कृतिक महोत्सवांतर्गत आनंद मेळावाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांना वाव मिळावा, व्यावहारिक ज्ञानाची प्रत्यक्ष जीवनाशी सांगड घालता यावी, नाणी व नोटा यांची समाज, नफा व तोटा या बाबी समजणे या हेतूने मेळाव्याचे मुख्य संयोजक प्रा. धर्मराज काळे, प्रा. जहीर सैय्यद सहा. शिक्षक महेंद्र ताकसांडे सहा. शिक्षिका भुवनेश्वरी गोपमवर यांच्या अथक परिश्रमातून  या आनंद मेळावाचे आयोजन करण्यात आले होते. 
            या मेळाव्याचे सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर चे माजी सचिव नोगराज मंगरुळकर यांनी उद्घाटन केले. संस्थेचे सचिव नामदेव बोबडे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले तर संचालक मंडळातील सदस्य माधव मंदे, महाविद्यालाचे प्राचार्य सुधाकर मोहारे, विभाग प्रमुख प्रा. धर्मराज काळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 
या कार्यक्रमात माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात कच्चा चिवडा,चना चिवडा, दही वडा, पॉप कॉर्ण, भजीया, चहा, साउथ इंडियन इडली, गुजराती ढोकला तसेच लज्जतदार इटालियन बिस्किट्सची दुकाने थाटली होती. ‘मराठमोळी पुरणपोळी’ व त्याला साजेसी  पारंपारिक मराठमोळी वेशभूषा घातलेल्या विध्यार्थींनी मेळाव्याचे विशेष आकर्षण ठरत होत्या. काही मनोरंजक खेळाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. दैनिक दिनचर्येतून उसंत मिळावी व अभ्यासाचे ताण कमी व्हावे हे या मेळाव्याचे उद्धिष्ट होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी व उद्घाटक तसेच प्रमुख अतिथींनी या प्रसंगी सर्व विध्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रत्येक स्टाल वर जाऊन विध्यार्थ्यांकडून नास्ता व इतर वस्तू खरेदी करून त्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याचे सूत्र संचालन प्रा. जहीर सैय्यद यांनी केले तर आभार प्रदर्शन सहा. शिक्षिका भुवनेश्वरी गोपमवार यांनी केले. या मेळाव्याच्या यशस्वीतेकारिता सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.