Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी २३, २०१८

श्रीहरी बालाजी महाराज घोडा रथ यात्रा उत्सवास प्रारंभ

२९ जानेवारी घोडा रथ यात्रा तर १ फेब्रुवारीला गोपालकाला 
   चिमूर/प्रतिनिधी:
    चिमूर येथील प्रसिद्ध ऐतिहासिक घोडा रथ यात्रा दि २२ जानेवारी पासून  उत्सवा ला  प्रारंभ होत असून दि २९ जानेवारी च्या रात्री भव्य मिरवणुकीसह घोडा रथ यात्रा व १ फेब्रुवारी ला गोपाल काला चे आयोजन करण्यात आले असून श्रीहरी बालाजी मंदिर च्या  प्रागणात  आमदार किर्तीकुमार भांगडीया च्या माध्यमातून दरवर्षी उत्सवात वेगवेगळया प्रसिद्ध मंदिराची प्रतिकृती उभारल्या जाते यंदा कलकता येथील प्रसिद्ध  दक्षिणेशवरी काली माता मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. 
        श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान मागील ३९१ वर्षा पासून दरवर्षी घोडा रथ यात्रा उत्सव साजरा करण्यात येते यावर्षी सुद्धा दि  २२ जानेवारी पासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे.  दि २२ जानेवारी पासून रात्री नारदेय कीर्तन हभप विनोद बुवा खोड उमरेड यांचे होणार आहे . दि २६ जानेवारी रात्री ११ वा  गरुड वाहन,    दि२८ जानेवारी रात्री ११वा मारोती वहन, ऐतिहासिक घोडा रथ व शोभा यात्रा दि २९ रात्री १० ते सकाळी ५ वा पर्यत  तसेच दि  १फेब्रुवारी ला गोपाल काला दु १२ ते ३ वा अश्या पद्धतीने यात्रेचे स्वरूप आहे . 
    श्रीहरी बालाजी महाराज च्या घोडा रथ यात्रेत दरवर्षी प्रमाने यंदाही  आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या पुढाकारातून  अगोदर सोमनाथ,जगनाथ पुरी, तिरुपती बालाजी ,पंढरपूर असे प्रसीद्ध मंदिराची प्रतिकृती साकारल्या गेली होती यंदा कलकत्ता येथील प्रसिद्ध काली माता मंदिर ची प्रतिकृती मंदिर  साकारल्या जात आहे  
चिमूर येथील आराध्य दैवत श्रीहरी बालाजी देवस्थानचे  विकास कामासाठी या अगोदर एकाही लोकप्रतिनिधी नि निधी दिला नव्हता परंतु  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व  अर्थमंत्री ,पालकमंत्री सुधीर मुनगटीवार व पर्यटन मंत्री जयप्रकाश रावल  यांच्या सहकार्यातून  आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी १५ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला त्या पैकी पर्यटन विभागा कडून ५ कोटी निधी मंजूर केले आणि कामास प्रारंभ झाले आहे  त्यात मोठे सभागृह ,सौदरी करण व इतर विकास कामे प्रस्तावित आहे. 
   घोडा रथ यात्रेत जास्तीत जास्त भक्तगण तथा जनतेनी सहभागी होण्याचे आवाहन श्रीहरी बालाजी देवस्थान चे अध्यक्ष नीलम राचल वार,अड चंद्रकांत भोपे, अड बबनराव बोथले,  सुरेश पाटील  डाहूले ,डॉ दीपक यावले ,डॉ मंगेश भलमे यांनी केले असून यात्रेत विशेष सहकार्य करणारे बालाजी भक्त मंडळ चे अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले आहे. श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान च्या यात्रेत ज्या भाविक भक्तांना सेवा बारा दिवस द्यायची असल्यास मंदिरात नोंद करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.
  

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.