चिमूर तालुक्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तपोभूमी असलेल्या गुंफा गोदेडा येथे नुकतीच गुंफा यात्रा पार पडली . या यात्रेत यात्रेकरूसाठी चिमूर बस आगाराने बस फेऱ्या पाठविल्या असता ९० हजार रुपयाचे उत्पन्न चिमूर बस आगाराला झाले
गोंदेडा गुंफा यात्रा समिती चे कार्यकर्ते तथा संजय गांधी निराधार समिती चे सदस्य पाडुरंग अडसुळेयांनी चिमूर बस आगारचे व्यवस्थापक यांचे सोबत संपर्क करून बस सेवा फेऱ्या वाढविण्यासंदर्भात चर्चा केली गोंदेडा गुंफा यात्रा मध्ये विदर्भातून गुरुदेव भक्त यात्रेकरू येत असतात त्यांच्यासाठी बस सेवा सुरळीत राहावी यासाठी आगाराने दखल घेतली. त्या दिवशी खास पेडल टाकून बस फेरी यात्रेकरूंसाठी दर ५ मिनीटांनी सोडत होते या एक दिवसीय यात्रेमधून एकूण ८८ फेऱ्या झाल्या असून एकूण उत्पन्न ९० हजार ९१८ रुपये झाले या बस सेवा फेऱ्या चे नियोजन विभाग नियंत्रक के एम सहारे यांचे मार्गदर्सनात आगार व्यवस्थापक आशिष मेश्राम , एच के सिडांम, सुधीर भिलकर, राजू बारापात्रे, नंदलाल तिवारी, नारायण धोटे, सचिन राठोड, मोहन पेडके, महादेव राठोड ,दिलीप कोलते यांनी परिश्रम घेतले.