ब्रम्हपुरी/ ग्रामीण प्रतिनिधी:
हितआयु लोकसेवा बहुद्देशीय संस्था,ब्रम्हपुरी अंतर्गत ब्रम्हपुरी रक्त सेवा यांच्या सहकार्याने तसेच महाराष्ट्र इन्स्टि. ऑफ फार्मसी,झेप निसर्गमित्र बहू. संस्था, स्वामी विवेकानंद पतसंस्था,शिवणकर हॉस्पिटल नागभीड यांच्या संयुक्त विध्यमाने भव्य रक्तगट तपासणी शिबीरसंपन्न झाला.
मा.संजुभाऊ गजपुरे यांच्या जन्म दिनानिमित्त नागभीड,तळोधी,गायमुख व कोसंबी या गावात आयोजित करण्यात आले होते. यात जवडपास २००० च्या वरून लोकांनी आपले रक्तगट व रक्तदाब तपासणी केली.
सध्या कोणत्याही आजार जर उद्भवला तर सहजासहजी रक्ततपासणी शिवाय उपचार केले जात.रक्त तपासणी करने म्हणजे - रक्तातील रक्तद्रव्य, तांबडया पेशी, पांढ-या पेशींची संख्या व प्रमाण तपासणे.रक्तस्राव किती वेळात थांबेल व रक्त किती वेळात गोठते हे पाहणे.रक्तातील प्रथिने, साखर, स्निग्ध पदार्थ क्षार, प्राणवायू, कार्बवायू, यूरिया,बिलिरुबीन, (काविळीत वाढते ते द्रव्य) आणि इतर अनेक घटकांचे प्रमाण पाहणे.रक्तातल्या प्रतिघटकांची पातळी आणि प्रकार (म्हणजे रोगजंतूंविरुध्द तयार होणारे संरक्षक पदार्थ पाहणे. विषमज्वरासाठी 'विडाल' तपासणी, लिंगसांसर्गिक रोगांसाठीव्हीडीआरएल' तपासणी, एचआयव्ही एड्स तपासणी अशा अनेक तपासण्या आहेत.
रक्तगट (ए, बी, ओ) व आर-एच तपासणे.रक्तातील जंतूंचे पृथक्करण करणे; त्यावर कोठली औषधे चालतात हे पाहणे,विशेषतः दीर्घकाळ ब-या न होणा-या तापात अशी तपासणी करतात.कावीळ, यकृतदाह, प्लीहासूज, हृदयविकार,इत्यादी आजारांत वाढणारीरासायनिक द्रव्ये तपासणे यामुळे गोर गरीब जनता या माध्यमातून रोगमुक्त होण्यासाठी या शिबिराच आयोजन करण्यात आले असे गजपूरे साहेब यानी व्यक्त केले.
आरोग्यसेवा या शिबिराच्या यशस्वी आयोजना बद्दल मा.संजुभाऊ गजपुरे यांनी हितआयु लोकसेवा बहू. संस्थे चे अध्यक्ष स्वप्नील अलगदेवे,सचिव प्रा.सुयोग बाळबुधे,महाराष्ट्र इन्स्टि. ऑफ फार्मसी चे प्राचार्य प्रा.विशाल लोखंडे तसेच सर्व संस्थेचे मनापासून आभार मानले.