- सिंदेवाही
- तालुक्यात अंधश्रद्धांचे प्रमाण प्रचंड आहे. तालुक्यातिल नवरगाव येथे भूत उतरविण्याच्या नावाखाली विनोद धकाते नावाच्या शिक्षकाचा बळी घेतला. टेकरी येथे जादूटोण्याच्या संशयावरून खून केला. रत्नापूरात नग्न धिंड काढली. उमरवाहीत अघोरी विद्या बाटविण्याच्या नावावर मुत्र पाजले. आंबोली येथे तथाकथित देविच्या सांगण्यावरून मांत्रीक असल्याचा संशय घेऊन तिन कुटूंबाला बहिष्कृत केले. सावरगाटा येथे एका इसमाचा खून केला. या सर्व ठळक घटना सिंदेवाही पोलीस स्टेशन अंर्तगत झालेल्या आहेत.
- या सर्व घटनांचा पाठपूरावा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला. जनप्रबोधन केले. शासनाने अंधश्रद्धांची दखल घेत 20 डीसेंबर 2013 ला जादूटोणा विरोधी कायदा केला. अभाअंनिसच्या वतिने पोलीस अधिका-यांना प्रशिक्षण देण्यात आले. तत्कालीन पोलीस अधिक्षक संदिप दिवाण यांचे पुढाकाराने जिल्हयातील पोलीस पाटलांनाही प्रशिक्षण दिले. तरीही पोलीस अंधश्रद्धांच्या घटनांची तक्रार आल्याशिवाय दखल घेत नाही. वारंवार नवरगाव परिसरात अंधश्रद्धेच्या घटना उजागर होत आहेत.
तरी जिल्हयात असणा-या अंधश्रद्धांच्या ठाण्यांची पोलीस विभागाने दखल घ्यावी. असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख हरिभाऊ पाथोडे यांनी केले आहे.
