Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जानेवारी ०७, २०१८

रामटेकची रोमा कामळे औषधीनिर्माण शास्त्र पदव्युत्तर परीक्षेत नागपुर विद्यापीठातून पहीली

 कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आला गौरव  
रामटेक तालुका प्रतिनिधी:
कामठीच्या श्रीमती किशोरीताई भोयर महविद्यालयाची विद्यार्थिनी रामटेक येथील कुमारी रोमा महादेव कामळे हिने औषधीनिर्माण शास्त्र  पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रथम वर्ष -2017(एम फॉर्म प्रथम वर्ष ) या परीक्षेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठातून पहीली मेरीट येण्याचा मान पटकाविला आहे. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल एनसीपी-एसपीसीपी प्रोफेशनल असोसिएशनने दिनांक 7 जानेवारी 2017 रोजी चिटणविस सेंटर,सिव्हील लाईन्स नागपुर येथे तिचा गौरव केला.नागपुर विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रमोद येवले यांच्या हस्ते तिला गौरवचिन्ह व दहा हजार रूपयांचा धनादेश देवून गौरविण्यांत आले.  
       औषधीनिर्माणशास्त्र विभागातील मेधावी विद्यार्थि-विद्यार्थिनींचा असोसिएशनतर्फे दरवर्षीच सत्कार करण्यात येतो. सत्काराचे वेळी असोसिएशनचे अध्यक्ष शिबू बाबु,सचिव गिरीश भट्टड,कोषाध्यक्ष संतोष जैन,सहसचिव श्रीकांत गुप्ता,अनुप तिवारी,कौन्सिल सदस्य डॉ.प्रकाश  ईटनकर व मोहन काळे उपस्थित होतेरोमा ही रामटेक नगरपालीकेचे माजी उपाध्यक्ष व प्रसिद्ध व्यवसायी महादेवराव कामळे यांची कन्या आहे.      
 यावेळी जिनल पटेल,अमृता नांबीयार,दिक्षा पटेल,अभिशेक शर्मा,श्रद्धा पाटील,विक्रांत महतो,निधी खेडपांडे,राशी गुप्ता,अन्वेशा गणोरकर,पवन कावळे,सुलोचना मालवकर,श्रीशा नांबियार,मीनल चव्हाण व वैष्णवी टोपले या  औषधीनिर्माण शास्त्र पदवी व पदव्युत्तर गुणवंताचा गौरव करण्यात आला. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.