Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी १५, २०१८

बल्लारपूर नगरपरिषदे तर्फे 'भिंती रेखांकन' स्पर्धेचे आयोजन

बल्लारपूर/प्रतिनिधी:
स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत बल्लारपूर नगर परिषदे मार्फत  गुरुवारी भिंती रेखांकन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

                        यात स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ,ओला व सुखा कचरा विलगीकरण, स्वच्छ भारत,स्वच्छतेचे नियम पाळणे, प्लास्टिकच्या वापरावर बंदी, शौचालाचे वाटप, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे, या विषयावर विध्यार्थ्यांना  भिंती रेखांकन करावयाचे आहे यासाठी विविध पुरस्कार देखील ठेवण्यात आले आहे .शालेय गट इयत्ता ८ ते १० वीसाठी प्रथम पुरस्कार ५०००, द्वितीय पुरस्कार ३०००, व तृतीय पुरस्कार २००० ,तर ११ वि पुढे शिकत असलेल्या विध्यार्थ्यांसाठी  प्रथम पुरस्कार ११०००, द्वितीय पुरस्कार ७०००, व तृतीय पुरस्कार ५०००, र खुल्या वर्गासाठी  प्रथम पुरस्कार ११०००, द्वितीय पुरस्कार ७०००, व तृतीय पुरस्कार ५०००,  अश्या प्रकारे पुरस्कार देखील ठेवण्यात आले आहे. 
             
                  शालेय गटाकरिता भिंतीचित्र रंगविण्याचे स्थळ हे राज्य महामार्गावरील वनविभागाची भिंत (FDCM) असून महाविद्यालयीन विध्यार्थ्यांसाठी व खुल्या वर्गासाठी पेपर मिल कलामंदिर ते काटा गेट अश्या प्रकारे करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी नाव निश्चित करण्यासाठी ९४२१५१७२०६,९६२३६२३४५२ या संपर्क क्रमांकावर नाव आहे, या स्पर्धेसाठी लागणारे पूर्ण साहित्य हे विद्यार्थ्यांनी स्वतःजवळचे आणायचे आहेत.







  

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.