Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी ०२, २०१८

जिल्ह्यातील 45 शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध

पात्र शाळा सुरु ठेवा अन्यथा पुरोगामी आंदोलन पुकारेल

चंद्रपूर/प्रतिनिधी:  
10 पेक्षा कमी पटसंख्या, आसपास दुसरी शाळा आहे, विद्यार्थ्यांचे समावेशन होत नाही, गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळत नाही या कारणास्तव चंद्रपूर जिल्ह्यातील 45 शाळा बंद करण्याचे शासनाकडून आदेश आले आहेत, त्यानुसार कार्यवाही सुरु आहे, या निर्णयाचा पुरोगामी शिक्षक संघटनेने जाहीर निषेध केला आहे तसेच सदर आदेश मागे न घेतल्यास संघटना आंदोलन पुकारून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देईल.
       बंद होणाऱ्या शाळांमध्ये एकूण 45 शाळांचा समावेश आहे. मात्र यापैकी अनेक शाळा बंद करण्यासाठी ठेवलेल्या निकषात बसत नाही तरीही ऑनलाइन सर्व्हे करून शाळा बंद करत आहेत, प्रत्यक्ष पाहणी करून पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांचे अहवाल न घेता बंद चे फर्मान निघाले आहे, तसेच नजीक शाळा उपलब्ध असतानाही विद्यार्थ्यांचे दूरच्या शाळेत समावेशन करण्यात येत आहे. हि अतिशय गंभीर बाब आहे.
   उदा. राजुरा तालुक्यातील 6 पैकी फक्त 2 शाळा निकषात बसतात, कोरपना तालुक्यातील गेडामगुडा सारखी ISO नामांकित  शाळा, अशी गुणवत्तापूर्ण शाळा बंद करण्यात येत आहे, बंद होणाऱ्यापैकी अनेक शाळा अ ग्रेड मध्ये आलेल्या आहेत, अनेक शाळा 1 कि मी च्या निकषात बसत नाही, तर काही शाळांचा या वर्षी पट वाढला आहे त्यामुळे तडकाफडकी शाळा बंद न करता पुन्हा एकदा सर्व शाळांचे सर्व्हेक्षण व्हावे व निकषात न बसणाऱ्या शाळांसह ग्रामीण, डोंगराळ, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करू नये अश्या आशयाचे निवेदन राज्याचे शिक्षण व ग्रामविकास मंत्री व सचिवांना नागपूर अधिवेशनावेळी पुरोगामी संघटनेच्या वतीने देण्यात आले.
तरीही शाळा बंद चा निर्णय झाल्यास गावकरी, पालक व विद्यार्थ्यांसह पुरोगामी शिक्षक संघटना रस्त्यावर उतरेल असे निवेदन पुरोगामी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, सरचिटणीस विजय भोगेकर, चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस हरीश ससनकर, वहिद शेख, विनोबा आत्राम, जगदीश ठाकरे, बाळू गुंडमवार, गुरुदेव बाबनवाडे, गुणवंत कुबडे, लक्ष्मण खोब्रागडे, संदीप येनुगवार, निरंजन गजबे, विजय कुंभारे, सुधीर कुंभारे, गणपत विधाते, रवी सोयाम, सुनील जाधव, पुंडलिक उरकुडे, रामकृष्ण चिडे, पंकज तांबडे, गणेश आसेकर, नरेंद्र मुंगले, गोविंदा गोहने, केवळराम मैन्द, सुधाकर कोल्हे यांनी केले आहे.शाळा बंद साठी इमेज परिणाम


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.