चंद्रपूर/प्रतिनिधी:
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी आपल्या 'मन कि बात' या कार्यक्रमात गौरवपूर्ण उल्लेख करणाऱ्या इको-प्रो संस्थेच्या चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानास मंगळवारी ९ जानेवारीला ३०० दिवस पूर्ण झाले आहेत . 550 वर्ष प्राचीन गोंड़कालींन चंद्रपूर शहरास गोलाकार वेढलेल्या किल्ला परकोट ची दुरावस्था बघता, त्यावर वाढलेली वृक्ष -वेली, झाड़ी-झुडपे सोबतच किल्ला लागून असलेल्या नागरिकांनी फेकलेला कचरा, जुने घर बांधकाम वेस्ट आदिमुळे किल्यास खंडर स्वरूप प्राप्त झाले होते. या ऐतिहासिक वारस्याची साफ-सफाई व्हावी, नागरिकामध्ये जन-जागृती व्हावी याकरिता इको-प्रो संस्थेने 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत 1 मार्च 2017 पासून "चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियान" सुरवात केली होती. या अभियान मधे रोज सकाळी 6:00 ते 09:00 या वेळेत श्रमदान करुन साफ-सफाई केली जाते.
आतापर्यंत या अभियानात चंद्रपूर किल्ला परकोटाचे ४ दरवाजे, ५ खिडक्या, ३९ बुरुज पैकी २९ बुरुज स्वच्छ करण्यात आलेली आहे, एकूण किल्लाच्या भिंतिपैकी 70 टक्के भींत आणि या किल्लावरुन पायदळ चालणाऱ्यांना मार्ग मोकळा करून देण्यात आला आहे, तसेच किल्लाच्या काही भाग 'हेरिटेज वाक' ऐतिहासिक सहल च्या दृष्टीने तयार करण्यात येत आहे। जेणेकरून येणाऱ्या पर्यटक आणि विद्यार्थ्यांना गोंड़कालीन इतिहास आणि वास्तुची माहिती देता येईल.
चंद्रपूर किल्ला अभियान 'मन की बात' मधे
या अभियानास २०० दिवस पुर्ण झाले असताना या श्रमदान चा उल्लेख २९ ऑक्टो २०१७ रोजी मा. पंतप्रधान नरेन्द्र मोदीजी, यांच्या 'मन कि बात' या कार्यक्रमात चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानाचा गौरवपूर्ण उल्लेख करीत इको-प्रो संस्थेच्या सदस्यांचा कार्याचे व चंद्रपुरकरांचे कौतुक केले. आपला ऐतिहासिक वारसा संवर्धन च्या दृष्टीने सुद्धा या अभियानाचे महत्व विषद केले.
या किल्ला परिसर स्वच्छता राबविन्यात आली
पठानपुरा गेट, जटपुरा गेट, बिनबा गेट, अचलेश्वर गेट, विठोबा खिड़की, हनुमान खिड़की, बगड़ खिड़की, मसन खिड़की, चोर खिडकी, आंबेकर लेआउट, शाही मशीद, कोनेरी ग्राउंड, दादमहल, आंबेकर लेआउट आदि परिसर स्ववच्छता राबविन्यात आली आहे.
नागरिकांना आवाहन
किल्ला परिसरात, किल्लावर अस्वच्छता होणार नाही, करू देणार नाही याकरिता परिसरातील नागरिक, युवकांनी पुढाकार घ्यावा, किल्लाच्या प्रत्येक परिसरात किल्ला स्वच्छ राहावा याकरिता परिसरातील नागरिकांची इको-प्रो ची शाखा तयार करण्यात येत आहे, यात किल्ला सोबतच आपला परिसर सुद्धा स्वच्छ करण्यास प्रयत्न करण्यात येणार आहे. यात नागरिक युवकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन इको-प्रो चे संस्थापक अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केले आहे.