चंद्रपूर-
चंद्रपूर जिल्ह्यात Mscit हा संगणक कोर्स उत्तीर्ण न केल्यामुळे अनेक शिक्षकांचे 10 वर्षापर्यंत ची लाखो च्या घरात असलेली रक्कम वसुली करण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेने सुरु केली आहे, त्याबाबत न्याय मागण्यासाठी पुरोगामी शिक्षक संघटनेने न्यायालयाचे दार ठोठावण्याचे ठरवले आहे.
Mscit हा तांत्रिक कोर्स आहे व शिक्षकांची सेवा ही तांत्रिक सेवेत मोडत नाही तसेच 1.1.2008 किंवा त्यापूर्वी व त्यानंतर कधीही प्रशासनाने अश्या कोर्स करण्याची वा वसुलीबाबतची सूचना शिक्षकांना दिली नाही तसेच नियमानुसार 2008 पूर्वी सदर कोर्स केला नाही तर पुढील वेतनवाढी बंद करायला पाहिजे होत्या त्याही बंद न करता सुरूच ठेवल्या व आता एव्हड्या वर्षांनी वसुली होत आहे हे चुकीचे आहे, त्यातल्या त्यात दरम्यानच्या काळात सेवानिवृत्त व मृत झालेल्या शिक्षकांकडूनही आता वसुली करण्यात येत आहे. राजुरा येथील मृत शिक्षक शांताराम मोरे यांच्याकडूनही अशीच 3लाख 92 हजार वसुली करण्याचे आदेश दिले आहे, त्यांच्या परिवाराला मिळणाऱ्या 4लाख निवृत्ती उपदानातून हि रक्कम कपात करण्यात येणार आहे त्यामुळे त्या कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. याविरोधात सर्व अधिकाऱ्यांकडे दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती अन्यायग्रस्त शिक्षकांसह मा.न्यायालयाकडे दाद मागणार आहे.
अश्या प्रकारची वसुली कोणाकडून होत असेल तर पुरोगामी शिक्षक संघटनेशी संपर्क करावा असे आवाहन विजय भोगेकर, नारायण कांबळे, दीपक वर्हेकर, हरीश ससनकर, प्रतिभा उदापुरे, सुनीता इटनकर, शालिनी देशपांडे, पौर्णिमा मेहरकुरे व अन्य पदाधिकारी यांनी केली आहे.
हरीश ससनकर
जिल्हा सरचिटणीस, चंद्रपूर
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
बुधवार, डिसेंबर २७, २०१७
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments