Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर २७, २०१७

‘सुंदर मी होणार नाही, तर सुंदर मी करणार’

वरोरा: ‘सुंदर मी होणार नाही, तर सुंदर मी करणार’ या वाक्यातून प्रेरणा घेवून जगभर अनेकजन सामाजिक भान जपत आहेत. अनेक व्यक्ती कुष्ठरोगाच्या आनंदात सहभागी होतात तसेच दु:खतही सहभागी व्हावे, असे प्रतिपादन महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी कर्मयोगी बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त आनंदवनात आयोजित समाज दिन कार्यक्रमात मंगळवारी केले.

कर्मयोगी बाबा आमटे यांचा जन्म दिन समाज दिन म्हणून साजरा केला जातो. आज आनंदवनात अनाम वृक्षांची स्मरणशीला आणि अनाम मूक कळ्यांचीस्मरण शिला तसेच कर्मयोगी बाबा आमटे व साधना आमटे यांच्या समाधीला मान्यवरांच्या हस्तेपुष्पचक्र अर्पण करुन कर्मयोगी बाबा यांच्या १०३ व्या जयंती कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. आनंदवन निर्मित स्वरानंद आर्केष्ट्राच्या चमूने बाबांची गीते सादर करुन बाबांच्या आठवणी ताज्या केल्या. यावेळी संचिताचे कवडसे या लेख मालिकेतील डॉ. विकास आमटे यांच्या लेखाचे आणि कर्मयोगी बाबा आमटेच्या कवितांचे वाचन करण्यात आले. यावेळी निलकृष्ण देशपांडे लिखित महामानव गीत वंदना या काव्यसंग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाला डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, गुलानी, सुधाकर कडू, डॉ. विजय पोळ, सदाशिव ताजने, गौतम करजगी, पल्लवी आमटे, सोमनाथ रोडे, प्रा. श्रीकांत पाटील, आनंद निकेतन महाविद्यालय वरोराचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, शेखर नाईक, माधव कविश्वर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी, जोडो भारत अभियानात सहभागी मंडळी, आनंदवन मित्र मंडळ वरोरा, आनंदवनातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन रवींद्र नलगरीवार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता ‘जोडो भारत’ या गिताने झाली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.