Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, डिसेंबर १२, २०१७

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची ‘सुयोग’ला भेट

नागपूर : पहिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज सकाळी सुयोग पत्रकार निवासाला भेट देऊन पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला.

एस. टी. महामंडळाच्या कारभारात पारदर्शकता व गतिमानता यावी यासाठी अनेक निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले की, “बसच्या वेळा व चालक-वाहकांच्या ड्युटी याबाबत संगणकीकृत प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे ड्युटीवाटपात पारदर्शकता येईल व बसच्या वेळा नियमित होऊन विद्यार्थी, तसेच रोज प्रवास करणारे नागरिक यांना लाभ होईल. पदभरती व परवाना प्रक्रियाही ऑनलाईन करण्यात आली आहे. 15 वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना पून:प्रशिक्षण दिले जाणार आहे. केवळ वातानुकुलीतच नव्हेतर इतर बसही अधिक आरामदायी व्हाव्यात, यासाठी बदल केले जात आहेत.”

अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही चर्चा पार पडली. शिबिरप्रमुख दिलीप जाधव, तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे इर्शाद बागवान यांनी स्वागत केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.