कन्हानचा व्यापार उध्वस्त होऊ देणार नाही : प्रकाश जाधव
कन्हान व्यापारी वर्गाने पाळला एक दिवसीय बंद
पारशिवणी /तालुका प्रतिनिधी :
शुक्रवारला कन्हान नगर परिषद मध्ये नगराध्यक्ष शँकर चहांदे यांच्या अध्यक्षतेत नगर परिषद मध्ये विशेष सभा घेऊन कन्हान अंतर्गत बनणाऱ्या महामार्ग चे बांधकाम एकूण ३४ मीटर जागेत बनविण्याचा ठराव सभेत ठेवून सर्वानुमते मंजुरी मिळवून दिली.सभेला एनएचएआई चे प्रोजेक्ट डायरेक्टर जिचकार आपल्या अधिकाऱ्यां सह नगर परिषद कन्हांप पोचले असता नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी नगर परिषदे अंतर्गत महार्गासाठी (५६-५६ फूट ) १७-१७ मीटर पेक्षा जास्त जगा न देता हाच ठराव मंजूर केला असल्याची माहिती एनएचआई च्या अधिकार्याना दिल्याची माहिती देण्यात आली आहे. रुंदीकरनाचे कार्य करण्यावर शिक्का मोर्तब करण्यात आलेला आहे.
नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ चे रुंदीकरनाचे कार्य एनएचएआय तर्फे केसीसी बिल्डकॉन कंपनी कडून कंत्राट पद्धतीने सुरु आहे.ऑटोमोटिव ते टेकाडी फाट्या पर्यँत होणाऱ्या चौपदरी रस्त्याचे कार्य कांद्री टेकाडी अंतर्गत प्रगती पथावर आहे.याच शृंखलेत कन्हान-कांद्री अंतर्गत महामार्गाच्या मध्यांतरा पासून ७५-७५ फुट जागा बांधकामासाठी काबीज करण्याच्या विषयावरून महामार्गावरील व्यापारी वर्गाचे धाबे दणाणले आहेत.
कांद्री ग्राम पंचायत क्षेत्रात सुरू असलेल्या ६० फुटाच्या दायऱ्याच्या स्वरूपातच कन्हान मध्ये देखील काम होण्याची चर्चा होती.ज्यावर कुठल्याही व्यापारी वर्गाला आक्षेप नव्हता.मंगळवारला कन्हान मधून महामार्गाचे कार्य सुरू करण्यासाठी ७५ फुटाची आखणी करण्यात आली आणि व्यापारी वर्गाचे धाबे दणाणले ज्यामुळे कन्हान क्षेत्रातिल व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाल्याने व्यापारी वर्गाने ७५-७५ फुटाच्या अतिक्रमणाचा पुरजोर विरोध दर्शवायला सुरुवात करत व्यापारी संघा कडुन माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात नगर परिषद कन्हान वर ता.७ ला धडक मोर्चा काढुन नगर परिषद कन्हान चे मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांना ५०० व्यापाऱ्यांनी जाधव यांच्या नेतृत्वात
कामठी नगर परिषदे अंतर्गत बनत असलेल्या २६ मीटर माप दंडा नुसारच कन्हान मधून रस्ता रुंदीकरण करण्या संदर्भात निवेदनातून मागणी केली.व्यापारि वर्गाचा रोष बघता संदर्भित विषया बाबद नगर परिषदेत शुक्रवार ता.८ ला बैठक घेऊन प्रस्ताव पारित करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले होते.ज्यावर
# एक दिवसाचा बंद...
शुक्रवारला कन्हान महामार्गावरील व्यापार्यांनी संपूर्ण दुकाने एक दिवस बंद पाळून पुन्हा जाधव यांच्या सह नगर परिषदेवर दुपारी १२:०० च्या सुमारास हल्ला चढवत नगर परिषदेच्या सभेत ठराव हा गाव हितार्थ घ्या या साठी मुख्यधिकारी यांची भेट घेतली व सभेत जे सदस्य या विषयाचा विरोध करत असतील व जे सभेला गैरहजर राहतील त्यांची नावे न भीता सार्वजनिक करण्यास मुख्याधिकारी यांना सांगितले.या क्षणी पोलिसांचा मोठा ताफा बोलविन्यात आलेला होता.