मादगी समाज हा महाराष्ट्र
आंध्रप्रदेश व कर्नाटक
सीमेलगत असलेल्या चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राहत असून विदर्भात व महाराष्ट्रातील इतर हि जिल्ह्यात समाज आहे. या समाजातील लोक मेमेल्या जनावरांची कातडी सोलणे व कातडी कमविणे शेती उपयोगी चामड्याचा वस्तू बनविणे जोडे चप्पल शिवणे तसेच लग्न समारंभात व अंत्यविधीला डफडे वाजविणे व शहरातील नाल्या गटारी साफ करणे शौचालय साफ करणे या सारख्या अस्वच व्यवसाय करतो हा समाज सामाजिक शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या अतिशय मागासलेला आहे.या समाजाला आरक्षण व एन.टी अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा व इतर मागण्यांना घेऊन आज मादगी समाज संघटनेने शहरातील मुख्य मार्गाने भव्य मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. नंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला.
मादगी समाजला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण मिळविण्यासाठी अनुसूचित जातीचे अबकड वर्गीकरण करण्यात यावे,अस्वछ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना ३ वर्षांपासून प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती त्वरित वाटप करावी,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील सन २०१४ मध्ये थेट योजनेअंतर्गत मंजूर झालेले कर्ज प्रकरण त्वरित वाटप करण्यात यावे. या सह विविध मागण्यांकरिता मादगी समाज संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.