Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर २१, २०१७

ऐतिहासीक विहीरीचे अस्तित्व धोक्यात


चिमुर  तालुक्यातील पर्यावरण संवर्धन समीतीचे उपविभागिय अधिकारी यांना निवेदन
चिमुर-तालुका प्रतिनिधी
चिमुर तालूक्यातील चिमूर जवळील कोलारा(तू), तीरखूरा आणी भीसी जवळील गडपीपरी या ठीकाणी प्राचीन काळातील  ऐतिहासीक विहीरी आहेत.ऐतीहासीक वारसा जपणे आपण सर्वाची जबाबदारी आहे .हा उद्देश समोर ठेऊन ऐतीहासीक वास्तुची स्वच्छता करण्यात आली पण त्या प्राचीन  वास्तू समस्याच्या विडख्यात सापडली आहे.पूरातन काळातील ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे . त्याचे अस्तीत्व काही काळापूरतेच मर्यादित आहे .पूरातन काळातील विहिरीला वाचवण्यासाठी आणी ऐतीहासीक वारस्याचे जतन होण्यासाठी आणी रस्ता रुंदिकरणातून वाचविण्यासाठी तीन्ही विहीरीकडे प्रशासनाने           लक्ष देण्यासाठी पर्यावरण संवर्धन समीती चिमुर कडुन उपविभागिय अधिकारी मार्फत जिल्हाधिकारी आणी पुरातन विभाग चंद्रपूर यांना निवेदन सादर
यावेळी पर्यावरण संवर्धन समीती चिमूरचे अध्यक्ष कवडु लोहकरे, राकेश राऊत , अमीत मेश्राम, महेश रासेकर, प्रशांत छापेकर, पीयूष जाधव, कार्तिक लोहकरे , ऋषिकेश बाहुरे, सचीन करंडे,पवन वनकर ,अमीत मोहीनकर , प्रफूल शेडामे आदि सदस्य ऊपस्थित होते

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.