Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर २१, २०१७

‘निळूर्स्टाइल’ पाटील यांना अखेर उच्च न्यायालयातून अटकपुर्व जामीन मंजूर

महीन्याच्या शेवटच्या रविवारी पोलीस ठाण्यात द्यावी लागणार हजेरी 
रामटेक तालुका प्रतिनिधी:
रामटेक पंचायत समीतीचे निलंबित विस्तार अधिकारी(पंचायत)चंद्रशेखर  माधवराव पाटील यांना अखेर उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाने दिनांक 19 डिसेंबर 2017 रोजी जामीन मंजूर केला आहे.पाटील यांचा जामीनासाठीचा अर्ज नागपुरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयांत जामीनासाठी अर्ज केला होता. रामटेक तालुक्यांतील महादुला ग्रामपंचायतच्या महीला ग्रामसेविकेला तिच्या मोबाईलवर
वारंवार मॅसेज देणे,व्हाट्स अपद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करणे,कार्यालयीन कामकाजासाठी इतरत्र बोलावणे व सर्वांसमोर अपमानीत करणे यासारखे आरोप पीडीत ग्रामसेविकेने पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी,सभापती व थेट जि.प.च्या कार्यपालन अधिकारी यांचेकडे केली होती.
 दरम्यान कारवाई होत नसल्याचे बघून ग्रामसेविकेने रामटेक पोलीस ठाण्यांत तक्रार दाखल केली. होती .या तक्रारीवरून रामटेक पोलीसांनी पाटील यांचेविरूद्ध भादंवि च्या ३५४,३५४(ए),३५४(डी) व अनुसूचित जाती जमाती(अत्याचार व प्रतिबंधक)कायदा 1989 चे कलम ३(२)(व्ही) .(ए) ३(१ )  डब्लू ,ए(३) १ डब्लू 2 अन्वये गुन्हा क्रमांक 640/2017 नोंदविण्यात आला. गुन्हा दाखल होण्याचे पुर्वीपासुनच पाटील यांनी वैद्यकीय रजेवर जाण्यासाठीचा अर्ज देवून पोबारा केला होता.दरम्यान जि.प.च्या सिईओ कादंबरी बलकवडे यांच्या आदेषानुसार पाटील यांचेविरूद्धच्या तक्रारींची चौकशी  करण्यासाठी जि.प.बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील महीला तक्रार निवारण समीतीने रामटेकला भेट दिली होती.सर्व पीडीतांचे व अन्य संबधितांचे बयाण नोंदविले होते .या चौकशीचा अहवाल सीईओ यांना समीतीने सादर केला. 
                       पाटील दोशी आढळल्याने त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यांत आले होते.निलंबनकाळांत  त्यांनी भिवापूर पं.स.कार्यालयात रूजु व्हावे असे आदेशही सीईओ यांनी दिले होते. आपल्याला अटक होऊ नये यासाठी पाटील यांनी नागपुर उच्च न्यायालयांत जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.19 डिसेंबर 2017 रोजी त्यांच्या अर्जावर सुनावणी होवून त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. महीन्यातील शेवटच्या रविवारी त्यांनी रामटेक पोलीस ठाणे येथे दुपारी 3 ते 5 या काळांत हजर राहावे असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.