Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, डिसेंबर १५, २०१७

मनसरच्या प्राथमीक आरोग्य केन्द्रासमोर राष्ट्रीय महामार्गावर भुयारी मार्गासाठी आमदार केदारांचा पुढाकार

रामटेक तालुका प्रतिनिधी:
रामटेक तालुका प्रतिनिधी-मनसर ते खवासा या  राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होत असून काम प्रगतीपथावर आहे.मनसर येथे प्राथमीक आरोग्य केन्द्रासमोर या मार्गावर रस्ता ओलांडण्यासाठी कुठलीच तजवीज करण्यात
आलेली नाही त्यामुळे या भागातील नागरीकांना व प्रामुख्याने  राष्ट्रीय आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होणार असल्याचा मुद्दा रामटेक पंचायत समीतीचे माजी उपसभापती व नागपुर जिल्हा ग्रामीण कॉंगेस कमेटीचे
महासचिव उदयसिंग यादव यांनी आमदार सुनिल केदार यांना याबाबत निवेदन सादर केले होते.आमदार केदार यांनी या महत्वाच्या समस्येकडे तात्काळ लक्ष देवून संबधितांची बैठक लावली. 

त्यात  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,महसूल  विभाग व चौपदरीकरणाचे काम करणारी ओरिएंटल कंपनीचे अधिकारी उपस्थित  होते.या बैठकीत सदर अडचण दुर करण्याबाबत आवश्यक  उपाययोजनाकरण्याबाबत कंपनीच्या अधिकाÚयांना निर्देषित करण्यात आल्याचे उदयसिंग  यादव यांनी कळविले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की उपरोक्त काम जोरांत सुरू आहे  मात्र काही तांत्रीक बाबी कंपनीच्या वतीने दुर्लक्षित केल्याने भविष्यात  नागरीकांना त्रास होणार असल्याचे लक्षात येताच उदयसिंग यादव यांनी या समस्यांबाबत निवेदन आमदार सुनिल केदार यांना दिले.या निवेदनाच्या प्रती  त्यांनी रामटेकचे उपविभागीय अधिकारी राम जोषी व राश्टिंय महामार्ग प्राधीकरणाचे प्रकल्प संचालक यांना देण्यात आल्या होत्या.समस्येची गंभीरता लक्षात घेत आमदार केदार यांनी सर्व संबधितांची बैठक लावण्यासाठी रामटेकचे उपविभागीय अधिकारी यांना सुचित केले.

तातडीने ही बैठक लावण्यात आली व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयापासून समोर आरोग्य केन्द्रापर्यंत रस्ता पावसाळयात बुडतो याबाबत व्यवस्था करावी,मनसर चौक ते मनसर गावातील सर्वेक्षणात सुटलेले तसेच विटभट्टा वस्तीतील रस्ता धकामामुळे बाधीत  नागरीकांना त्यांचे घराचा मोबदला मीळण्याबाबत,रस्ता ओलांडण्यासाठी लोकांना व विद्यार्थ्यांना भुयारी मार्ग आवष्यक असल्याने त्याची व्यवस्थ करावी व रस्ता बांधकाम अधिग्रहणात सर्वेक्षणात सुटलेल्या लोकांना त्यांची जागा व ईमला  बांधकामाचा पुर्ण मोबदला देण्यासंबधात कार्यवाही करावी अषी सुचना आमदार केदार यांनी यावेळी केली संबधित विभाग व कंपनीच्या अधिकारी यांनी यांनी तात्काळ या मागझया मान्य केल्या व लगेच सर्वेक्षण करण्याचेही आश्वासन दिले.सदर बैठकीत उदयसिंग यादव,महसूल विभागाचे नायब तहसिलदार  विजयकुमार चौबे, राष्ट्रीय  महामाग् प्राधिकरणचे श्री रमेश ,ओरिएंटल कंपनीचे  सोमदत्त षर्मा,ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सुरेश  कोडापे,साबीर कादरी,देवेंद्र राउत,संतोश बोरीकर,कंचन धनोरे,सिमा गजबे,मोहन भगत,आशिष कळंबे,योगेष गोस्वामी,राजकुमार गुप्ता,अन्नु कादरी,अवनेषसिंग बिसेन,रोहीत ताटी,सचिन खागर,आषोक बांगरे,भुषण कडुकर व मनसर येथिल अनेक नागरीक उपस्थित होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.