Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, डिसेंबर १५, २०१७

समाजसेवक डॉ. गिरिधर काळे मित्रमंडळ तर्फे पाणपोई

चंद्रपूर/प्रतिनिधी:
समाजसेवक डा.गिरिधर काळे मित्रमंडळ व सेवार्थ ग्रुप, साई स्पोर्टीग  क्लब, सेव्हन स्टार स्पोर्टीग क्लब बिबी तर्फे पाणपोई चे उद्घाटन करण्यात आले. बिबी येथे तीन दिवसीय बीट स्तरीय शालेय  क्रीडा स्पर्धा सुरू आहे. क्रीडापटू विद्यार्थी व नागरिकांना दिलासा मिळावा याकरिता युवक मंडळींनी एकत्र येऊन पाणपोई सुरू केली आहे. समाजसेवक डॉ.गिरिधर काळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख देवाळकर, लहामगे, पोलीस पाटील राहुल आसुटकर, अविनाश पोईनकर, हबीब शेख, स्वप्नील झुरमुरे, उपस्थित होते. चंदू झुरमुरे, विठ्ठल अहिरकर, गणपत तुम्हाणे, महेश नाकाडे, सूरज लेडांगे, राजू खनके, सतीश पाचभाई, हिराचंद्र कुमरे, इराना तुम्हाने, सचिन मडावी, उमेश सपाट, गौरव येटे, शुभम मडावी, निलेश पानघाटे, शंकर मडकाम, राजू पिंपळकर, स्वप्नील वैद्य, कैलास कोटणाके, प्रवीण निमकर, अकलेश येडमे या युवकांनी पुढाकार घेतला.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.