Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, डिसेंबर १५, २०१७

शाळेचे विद्यार्थी घेऊन जाणारा ऑटो पलटला

चंद्रपूर प्रतिनिधी:

चंद्रपूर येथील जटपुरा गेट रामाळा तलाव मार्गावरील श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय जवळ शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान MH.34.D.6937 हा शाळेचे विद्यार्थी घेऊन जाणारा आटो पलटण्याची ची घटना घडली.
 या ऑटोमध्ये एकूण सात विद्यार्थी शाळेतुन घरी जात होते. ऑटोचालक हा दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे व त्यांनी एका विद्यार्थ्यांच्या हातात ऑटोचे स्टेरिंग दिल्याने ऑटो पलटण्याची घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात बि.जे.एम कार्मल स्कूल शाळेतील ऐकून सात विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती हाती येत आहे. या सर्वांना जवळपास असलेल्या खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असल्याचे वृत्त आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.