जंगल सफारी करीत असताना पर्यटकांना वाहनाच्या बाहेर निघता येत नाही. आपल्या शरीराचा कोणताही भाग बाहेर काढण्यास सक्त मनाई आहे. वनकर्मचारी असो अथवा वनविभागाचे बडे अधिकारी असोत, अशाप्रकारे वाहनाच्या छतावर बसून फोटोग्राफी करता येत नाही. असे असताना वाहनाच्या छतावरून फोटोग्राफीचा हा प्रकार उमरेड-पवनी- कऱ्हांडला अभयारण्य आता आणखी एका फोटोशुटमुळे सोशल मिडियाच्या माध्यमातून चर्चेत आले आहे. वनविभागाच्या वाहनाच्याच छतावर बसून वाघोबाची फोटोग्राफी करण्याचा हा अक्षम्य प्रकार फेसबूक व व्हॉट्सअॅपर व्हायरल झाल्याने हे अभयारण्या पुन्हा चर्चेत आले असून, या प्रकाबाबत सर्वत्र टीकेची झोड उठत आहे.
नागपूर/प्रतिनिधी :
उमरेड अभयारण्यात वाघाचं चित्रकरण करणारी व्यक्ती अभयारण्यातील हंगामी कर्मचारी असल्याचं समोर आलं आहे. विपीन तलमले असं त्याचं नाव असून माध्यमांच्या बातमीनंतर कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे.
विपीन तलमले वाघ बघण्यासाठी थेट जीपच्या टपावर चढला होता. यावेळी वाघ त्याच्या समोर येऊन उभा ठाकला. विशेष म्हणजे वाघ जीपच्या मागच्या बाजूला होता. त्यामुळे ड्रायव्हरला त्याचा अंदाजही नव्हता.
यानंतर ड्रायव्हरनं पार्किंग लाईट्स लावल्यामुळे वाघाचं लक्ष थोडं विचलित झालं. मात्र कर्मचाऱ्याचं नशीब बलवत्तर म्हणून वाघ तिथून शांतपणे निघून गेला. अन्यथा हे धाडस कर्मचाऱ्याच्या जीवावरही बेतू शकलं असतं.