पाच आरोपिणी पिस्टल च्या धाकावर घातला होता दरोडा
तालुक्यातील कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील गोंडेगाव वेकोली कॉलनी स्थित युको बँकेच्या शाखेत ५ अज्ञात आरोपींनी पिस्टलच्या धाकावर ११ ऑगस्ट च्या संध्याकाळी ४:३० च्या सुमारास ६ लाख ९९ हजार ५०० रुपयाचा दरोडा घातलेला होता.तोंडाला मुस्के बांधून बँकेत शिरून बंदुकीच्या टोकावर बँकेतील कर्मचाऱ्यांना रोखून ठेवन्यात आले होते. बँकेच्या रोखपाला पासून तसेच बँकेच्या तिजोरी तुन एकंदरीत ६ लाख ९९ हजार ५०० रुपयाचा मुद्दे माल बॅग मध्ये भरून कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याना बँकेच्या खोलीत बंदिस्त करन्यात आले
होते. बँकेतील सीसीटीव्ही सह सामानांची तोड फोड देखील करण्यात आली होती.दरम्यान आरोपी कडून गोळीबार न झाल्याने कुठल्याही प्रकारचे अनुचित घडले नव्हते.बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग हार्ड डिस्क देखील आरोपी सोबत घेऊन पसार झालेले होते.ज्यानंतर घटना स्थळावर पोलिस अधीक्षक शैलेश बलकवड़े,अतिरिरिक्त पोलिस अधीक्षक नरसिंग शेरख़ाने,उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे, तत्कालीन कन्हान चे पोलिस निरीक्षक रविन्द्र गायकवाड़,तत्कालीन एपीआय देवानंद लोनारे हे घटना स्थळावर डॉग स्कॉट व फिंगर प्रिंट एक्सपर्ट ची टीम घेऊन दाखल झाले होते दरोड्यातील गुन्हेगारांनी संपूर्ण पुरावे नष्ट करून पसार होणे म्हणजे आरोपींच्या दरोड्या संदर्भात केलेला अमित ज्वेलर्स दरोड्याच्या पाश्र्वभूमीवर केलेल्या अभ्यासाची ग्वाही होती.घटनेच्या ४८ तासांच्या आत बँक कर्मचाऱ्याच्या माहितीवरुन हाती आलेला एका आरोपीचा स्केच कितपत तपासाच्या दिशेला गतिशील बनविते या कडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. परंतु दरोडेखोरांना पकडण्यात घटनेच्या तीन महिन्यानंतरही पोलिस सफल अपयशी ठरल्याने पोलिसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्हे उभी झालेली आहेत.
दोन महिन्यात दोन मोठे दरोडे...
२०१७ च्या सुरवातीलाच १४ में ला अमित ज्वेलर्स वर गोळीबार करत दरोडा पडला होता.नंतर २ महिन्यातच ११ ऑगस्ट ला युको बँक वरील दरोड्याने संपूर्ण परिसर हादरलेला होता.कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत येणारा संपूर्ण परिसर रेती,कोळसा,माती,दगड यांची तस्कर सोबतच अवैध शस्त्र साठा बाळगनार्यांचा संख्या,शस्त्रांच्या धाकावर लूटमार करणारे आरोपी,अवैध धंद्यांमध्ये व्यस्त असणाऱ्यांची इथे कमी नसल्याची येथील माफिया पोलिसांच्या चांगलेच मानगुटी बैसलेले आहेत.
अमित ज्वेलर्स नंतर पिस्टल विकणाऱ्या आरोपींवर देखील कठोर कार्यवाही न होता त्यांना न्यायालयाने जामिनावर मुक्त करून दिले होते त्यानंतर युको बँक दरोडा मग लागोपाठ कांद्री परिसरात कामठी येथील एका वेकोली कर्मचाऱ्यावर गोळीबार करून आरोपी पसार होण्यात यशस्वी झालेले होते.तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या कार्यकाळात गोळीबार,पिस्टल या प्रकरणांना चांगलाच उत आलेला होता ज्यात फक्त अमित ज्वेलर्स दरोड्यातील आरोपी सात दिवसात गजा आड करण्याचे श्रेय गएलसीबी ग्रामीण सह तत्कालीन पो.नि. गायकवाड यांच्या पदरात आले होते.तर युको बँकेचे आरोपी अद्यापही पसार का हा प्रश्न नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण तयार करत आहे.
घटनेची पुनरावृत्ती...पुरावे केले नष्ट
अमित ज्वेलर्स वर झालेल्या दरोड्यातील मुस्के बांधलेले आरोपी हे गुन्हा करताना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले होते ज्या मुळे पोलिसांना त्यांच्या हालचालीवरून तपासाची पक्की सूत्रे मिडाली होती ज्याने सात दिवसात अमित ज्वेलर्स चे आरोपी गजाआड करण्यात आले होते.तेव्हा सदर युको बँक दरोड्यातील आरोपीनि त्या घटनेच्या तपासाची सूत्रे लक्षात घेता नियोजन बद्ध पणे स्वतः विरोधात संपूर्ण पुरावे नष्ट करत दरोड्याला यशस्वी केल्याचे दिसून येत आहे.
बँकेत सुरक्षा रक्षकांची कमी होती
सदर घटनेतील युको बँकेच्या शाखेत एकही सुरक्षा रक्षक कर्तव्यावर नसल्याची माहिती आहे तर सुरक्षेच्या हिशोबाने बँक प्रशासनाद्वारे बँकेच्या बाहेर वीजेचे लाईट व सीसीटीव्ही देखील नसल्याची माहिती बँकेच्या सभोवताल असणाऱ्या वेकोली कर्मचारी वसाहतदारांनी दिलेली होती.