Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, डिसेंबर ०४, २०१७

चंद्रपूर मनपाने ठोकले बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमला कुलूप


चंद्रपूर/प्रतिनिधी:

कराचा भरना न करणाऱ्या शासकीय कार्यालये व व्यापारी प्रतिष्ठानांविरुद्ध महानगरपालिकेने जप्तीची मोहीम हाती घेतली असून आज मनपाने बँक ऑफ महाराष्ट्रच्या  एटीएम ला कुलूप ठोकले आहे. मनपा हद्दीतील शासकीय कार्यालये व खासगी प्रतिष्ठानाकडे कोट्यवधी रूपयांचा कर थकीत आहे. थकबाकीदारांना मनपाने नोटीस बजावले. मात्र, तरीही कराचा भरणा केला नाही. त्यामुळे मनपाने जप्तीची धडक मोहीम हाती घेतली. 

 शनिवारी झोन क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या पिंक प्लॅनेट या प्रतिष्ठानावर जप्तीची कारवाई केली. पिंक प्लॅनेटच्या मालकाकडे ४ लाख ५१ हजार रुपयांचा कर थकीत आहे. याच मार्गावरील यंग व्यायाम शाळेकडे ९० हजार ७४२ रुपयांचा कर थकीत होता. मनपाचे अधिकारी या प्रतिष्ठानावर कारवाई करण्यासाठी धडकताच, त्यांनी कराचा भरणा केला. त्यानंतर मनपा अधिकाºयांनी आपला मोर्चा भुक्ता इमारतीकडे वळविला. भुक्ता या मालमत्ताधारकाकडे ३ लाख ९२ हजार रुपयांचा कर थकीत आहे. या मालमत्ताधारकाची दुकानाची चाळ आहे. येथे तीन दुकाने आहेत. ही तिन्ही दुकाने कारवाई दरम्यान बंद होती.

मात्र कराचा भरणा करण्यास कुणीही तयार नसल्याने मनपा अधिकाऱ्यांनी या इमारतीमधील महिंद्रा कार्यालय, मारोती सुझुकी व प्रोव्हिन्शियल नावाने असलेल्या तिन्ही दुकानांना सील ठोकले. मनपा क्षेत्रातील मालमत्ता धारकांने शासकीय कराचा वेळेवर भरणा करून मनपाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.