Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, डिसेंबर ३०, २०१७

प. पु. सदगुरू दादाश्री महाराजांचा मुक्तेश्वरी गुरुपीठाचे उत्तराधिकारी

*  ह..प सुभाष महाराज बावनकर यांच्या हस्ते विधीवत पार पडला 
* आमदार बाळु धानोरकर यांची प्रामुख्याने  उपस्थिती

चंद्रपूर दि.३० (प्रतिनिधी):
सत्संगाच्या माध्यमातून सामाजिक क्रांती घडविणारे सिद्धमहायोगी शक्तीपाताचार्य प. पु. सदगुरू  प्रियानंद महाराजांचा सोळाष्टी सोहळा तसेच त्यांचे सुपुत्र प. पु. सदगुरू  दादाश्री महाराज यांचा उत्तराधिकारी  सोहळा  मुक्तेश्वरी  गुरुपीठ निमगाव, वर्धा येथे  २८ डिसेंबर २०१७ रोजी  ह.भ.प सुभाष महाराज बावनकर यांच्या हस्ते विधीवत पार पडला असुन यावेळी  भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार बाळु धानोरकर यांची प्रा‘ुख्याने उपस्थिती  होती.
भगवान नित्यानंद बाबांचे कृपाधिष्टीत तसेच सिद्ध परंपरेतील महान संत, शक्तिपात, ध्यानसाधना, व सिद्धयोगाची दीक्षा तसेच सत्संगाच्या माध्यमातून सामाजिक क्रांती घडविणारे सिद्धमहायोगी शक्तीपाताचार्य प. पु. सदगुरू  प्रियानंद महाराज १३ डिसेंबर २०१७ रोजी ब्रम्हलीन झाले, त्या पाश्र्वभूमीवर २८ डिसेंबर २०१७ रोजी प. पु. सदगुरू प्रियानंद महाराजांचा सोळाष्टी सोहळा तसेच त्यांचे सुपुत्र प. पु. सदगुरू  दादाश्री महाराज यांचा उत्तराधिकारी सोहळा मुक्तेश्वरी गुरुपीठ निमगाव, वर्धा येथे संपन्न झाला.
सोहळ्याची सुरुवात दादाश्रींच्या मंगलंमयस्नानाने झाली, त्यावेळी साधनरत असलेल्या सोळा ब्राम्हणांचा यथोचित सत्कार करून, दादाश्रींनी प. पु. सदगुरुंच्या समाधीचे तसेच  सदगुरूंच्या आणि भगवान नित्यानंद बाबांच्या पादुकांचे पूजन केले.तर प्रतिभाताई घोंगे यांनी दादाश्री महाराजांच्या पादुकांचे पूजन केले.उपस्थित ब्राम्हणांच्या वतीने महामंत्राचा जयघोष,  वेदपठण,तसेच गायत्री मंत्रजप करण्यात आले.
ह.भ.प सुभाष महाराज बावनकर यांच्या हस्ते उत्तराधिकारी  सोहळा विधीवत पार पडला. तसेच गुरुपीठातील ज्येष्ठ साधक रविंद्र इंगोले आणि समीर शेंडे यांच्या हस्ते दादाश्रीना पवित्र आसनावर विराजमान करून एकवीस साधकांच्या वतीने दादाश्रींचे माल्यार्पण करण्यात आले. या सर्व विधीनंतर दादाश्रींना मुक्तेश्वरी  गुरुपीठातील सर्व साधकांच्या वतीने पदभार सोपविण्यात आला त्याचबरोबर सर्व साधकांच्या वतीने प. पु. सदगुरू   दादाश्री  महाराज असे नामकरण करण्यात आले. मुक्तेश्वरी  गुरुपीठावर यापुढे  शक्तिपात दीक्षेचा प्रचार, प्रसाराचे कार्य दादाश्री  महाराजांच्या आज्ञेनुसार पार पडेल असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
यावेळी आ. बाळु धानोरकरसह हजारोंच्या संख्येने साधक वर्ग उपस्थित होता.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.