Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, डिसेंबर १२, २०१७

वाघाच्या तावडीतुन सुटली... रेखा

चिमूर तालुका प्रतीनीधी:

          चिमूर - नेरी मार्गाच्या बाजुला आपल्याच शेतात
सकाळी एकटीच कापुस काढन्यासाठी आली असताना दुपारच्या दरम्यान तिच्या मागुन पट्टेदार वाघ शेतात आला व ती कपाशीतुन वाकून कापुस काढत असताना तिला पंजा मारला. मात्र पाठीवर कापुस काढन्याच गाठोळ असल्यान वाघाच्या पंजाचा वार कापसाच्या गाठोळ्यावर गेला. तिने मागे वळून पाहीले असता तिला पट्टेदार वाघ दिसला वाघाला न घाबरता धर्याने कपाशीला आपल्या शरीराभोवती झुडूप तयार करून तिने आरडाओरड केली चिमुर- नेरी मार्गावरून ये - जा करनाऱ्या वाहनांनी तिचा आरडा -ओरड चा आवाज एकल्यावर  शेताकडे मोर्चा वळवीला नागरीकांना पाहुन वाघ शेतातुन पळून गेला.व तिने निसंकोच सुटकेचा श्वास सोडला. तिच नाव रेखा गजानन उताने असुन ती सोनेगाव (काग)येथील रहीवासी आहे. ही घटना मंगळवार ला दुपारी १२ वाजता घडली.

            ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या काही अंतरावर असलेल्या चिमुर_नेरी मार्गावर  मागील दोन महीन्यापासुन दोन वाघाचा वावर आहे. याच मार्गावर काही दिवसा पूर्वी बागला कॉन्वेट च्या विद्यार्थ्यांनी कॉन्वेटच्या बाजुला वाघ पाहीला होता. याच वाघानी त्याच परीसरात दोन गायी ही मारल्या होत्या. त्यामुळे नागरिकांत भितीने वातावरण तयार झाले होते. मंगळवार ला रेखा सकाळी सोनेगाव वरून आपल्या शेतात कापुस काढन्यासाठी शेतात एकटीच गेली होती. पहीला कापसाचा गठोळा काढुन झाला होता. दुसऱ्या गठोळ्यासाठी कंबरेला साडी गुंडाळून शेतात वाकुन कपाशीतुन कापुस काढून गठोळ्यात टाकत होती. थोडा कापुस गठोळ्यात जमा झाला होता. अशातच दुपारच्या दरम्यान तिच्या पाटी मागुन पट्टेदार वाघ आला व तिला पंजा मारला मात्र पाठीवर कापसाचे गाठोळ असल्यान वाघाचा वार गाठोळ्यावर गेला. वाघाच्या पंजाने त्या गठोळ्याला तिन छिद्र पडले. तिने मागे वळून पाहिले असता वाघ दिसला वाघाला न घाबरता धर्याने शेतातील कपाशी शरीराला गुंडाळून झाडासारखी उभी राहुन आरडा - ओरड करीत राहीली.

            देव तारी त्याला कोन मारी या उक्ती प्रमाने मार्गावर धावत असनाऱ्या वाहनांना तिचा आरडा ओरड चा आवाज ऐकु आला. त्यांनी वाहने थांबवुन शेताकडे धाव घेतली असता नागरिकांना पाहुन वाघ शेतातुन पळून गेला.कळमगाव येथील अंकीत गुलाब लाडसे सायकलनेे त्याच परीसरात आईसाठी डब्बा घेवुन येत असताना त्याच मार्गावर डांबर रोडवर वाघ उभा असल्याचे पाहताच पळ काढला. याच दिवशीही दुसरी घटना घडली. मात्र रेखाच्या शरीराला वाघाने कोनतीही इजा केली नाही. या संदर्भात वनविभागाला माहीती मिळताच वाघाला शोधन्यासाठी वन विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. मात्र वाघाला शोधन्यास अपयश आले वाघाचा थांगपत्ता लागला नाही.

          परीसरात सध्या कापूस काढणीचा हंगाम सुरू असल्याने मजुरामध्ये वाघा विषयी भिती निर्माण झाली आहे. कापूस काढणी सोडुन मजुर घरी परतले. त्यामुळे आम्ही कापुस काढणीला जानार नाही अशी भुमीका मजुरांनी घेतल्यामुळे शेतकऱ्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या परीससरातील वाघाचा बंदोबस्त करन्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.