- आम्रवन दिक्षाभुमी सुगतकुटी मालेवाडा येथे आयोजन
चिमूर /तालुका प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील मालेवाडा येथील आम्रवण दिक्षाभूमी सुगतकुटी भिक्षुसंघ व बौद्ध पंचकमेटी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक १६ व १७ डिसेंबरला भव्य धम्म मेळावा व सविधान संस्कृती सम्मेलनाचे आयोजन केले असुन या दोन दिवशीय कार्यक्रमात भिक्कु संघ आणी विचारवंत मान्यवरांचे मार्गदर्शन होणार असुन या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .
धम्म प्रबोधन तसेच सामाजिक जागृकता करीता सुगतकुटी मालेवाडा येथे दरवर्षी धम्म मेळावा व सामाजीक प्रबोधनाचे कार्यक्रम घेतल्या जातात दोन दिवसीय या कार्यक्रमात १६ डिसेंबरला प्रथम सत्रांत धम्म मेळाव्याचे उद्घाटन महाथेरो भन्ते नागार्जुन सुरई ससाई , महाथेरो भन्ते सुगतानंद , भन्ते चंद्रमणी यांचे हस्ते होणार असुन त्यांचे कडून पंचशील ध्वजारोहण , बुद्धवंदना व धम्मदेसना होणार आहे . यावेळेस समता सैनिक दला तर्फे पथसंचालन केल्या जाणार आहे . द्वितिय सत्राचे उद्घाटन विश्व बौद्ध मिशनचे जिंदा भगत करणार असुन दुपारी १२ .०० वाजता बुद्ध भिमगीताचे प्रबोधन कार्यक्रम होणार आहे . दुपारी ३ .०० वाजता तृतिय सत्रात संविधान संस्कृती समोरील आव्हाने या विषयावर परिसंवाद होणार असुन या परिसंवादामध्ये जिंदा भगत , यशवंत मनोहर , प्रा . जावेद पाशा , प्रा . जावेद खान , नंदाताई फुकट , बी .डी . नानवटे , प्रा . भगवान नन्नावरे इत्यादी मान्यवर भाग घेणार आहेत . चौथ्या सत्रात रात्रो ८ .०० वाजता बुद्ध भिम गायन स्पर्धा आयोजीत केली आहे .
रविवार १७ डिसेंबरला प्रथम सत्रात धम्मदेसना , भिक्कु संघास भोजनदान . द्वितिय सत्रात माजी सनदी अधिकारी ई .झेड . खोब्रागडे , समाजकल्याण आयुक्त मिलींद शंभरकर , कॉस्ट्राईब अध्यक्ष कृष्णा इंगडे , राजरतन खोब्रागडे यांचे मार्गदर्शन . तृतिय सत्रात आमदार प्रा . जोगेंद्र कवाडे , आमदार बंटि भांगडिया , आमदार विजय वडेट्टीवार , माजी आमदार डॉ .अविनाश वारजुरकर , जिल्हा परीषद गट नेते डॉ . सतिश वारजुरकर , जिल्हा परिषद सदस्य राजेश कांबळे , सदस्य गजानन बुटके , ममता डुकरे , पंचायत समीती सभापती विद्या चौधरी , अशोक रामटेके , राजु कापसे , प्रा . रंजीत मेश्राम , सरपंच पलवी शेंडे , कैलास शेंडे , हेमंत गजभिये उपस्थीत राहणार आहेत . धम्म मेळाव्याच्या शेवट धम्मदेसना , मंगल मैत्री ने होणार असुन या कार्यक्रमाचा लाभ समस्त जनतेनी घ्यावा असे आवाहन आयोजकातर्फे करण्यात आले आहे .