Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, डिसेंबर १०, २०१७

ओबीसींवर चुकीच्या धोरणांमुळे अन्याय - मायावती

नागपूर/प्रतिनिधी - भाजप सरकार हे दलितांच्या द्वेशाचे राजकारण करत असल्यामुळे मी राज्यसभेचा राजीनामा दिला असे सांगून मायावती यांनी काॅग्रेसने मंडल कमिशनच्या शिफारशी लागू केल्या नाही, आम्ही मोठा लढा दिल्याचे म्हणाल्या.
व्ही पी सिंग यांना बाहेरून पाठिंबा दिला होता तो फक्त दलिताचा उद्धार आणि बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याच्या अटीवर होता.
‬राजीनामा दिल्यानंतर मी दलितासोबतच, आदिवासी, मुस्लिम आणि इतर मागासवर्गीय लोकांच्या उत्थानासाठी देशव्यापी दौरा करून काम सुरु केल्याचे त्या म्हणाल्या.
आता भाजपला मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गायांचा पुळका आला आहे.  देशभरात अनेक उद्योगात खासगीकरण केले जात आहे पण खाजगी उद्योगात मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीयांना आरक्षण नाही. त्यामुळे त्यासाठी लढा देण्याच्या आम्ही तयारीत आहोत. पण कांग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न देण्यास टाळाटाळ केली असेही मायावती यांनी सांगितले.
: बाबासाहेबांना भारतरत्न दिल्यावर आणि मंडल आयोग लागू झाल्याने भाजपाला आवडले नाही त्या मुळे व्हि पी सिंग सरकारचे समर्थन हे भाजपने काढले, असा आरोप केला.
मुख्यमंत्री असतांना उत्तर प्रदेशात एकाही शेतकर्यांने आत्महत्या केली नाही -  उत्तर प्रदेशातील मतदारांना नरेंद्र मोदींनी दिवा स्वप्न दाखवले होते.  महाराष्ट्र राज्यातील शेतकर्यांची अवस्था बिकट आहे.  आताचे उत्तर प्रदेश मधील सरकार दलितांवरील अत्याचाराच्या प्रकरणात साधी एफआयआर देखील दाखल करत नाही - : आरएसएसचा हिंदुत्ववादी अजेंडा आणि भाजपचे हवाहवाई आमिषांबाबत लोकांना माहिती द्या, असे आदेश मायावतीनी कार्यकर्त्यांना दिले.
सीबीआय, इन्कम टॅक्स आणि ईडी या चौकशी संस्थांचा वापर करून विरोधकांना  संपवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरु आहे, असाही आरोप मायावतींनी केला.
देशात लोकसभा निवडणूका पुढ्यात असल्यामुळे आमिषांचा पाऊस सुरु झाला आहे
: काॅग्रेस आणि भाजप दोन्ही दलित विरोधात
[ राष्ट्रपती, मुख्यमंत्री जरी दलित समाजातील झाले असले तरी हे लोक दलित विरोधी पक्षातील असल्यामुळे त्यांच्याकडून दलितांचा काही विकास नाही.  जीएसटी आणि  नोटबंदी मुळे भाजपमधूनच उघड विरोध सुरु आहे.  राम मंदिर होवो किंवा अन्य कोणते मंदिर होवो यामुळे फक्त पुजार्यांचे पोट भरेल.  जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघा सारख्या हिंदुत्ववादी संघटनांनी जर दलित विरोधी कारवाया थांबवल्या नाही तर मी ही बाबासाहेबांच्या पावलावर पाय ठेऊन कोट्यवधी लोकांना घेऊन हिंदु धर्म त्याग करून बौद्ध धर्मात प्रवेश करेन, असाही आरोप मायावती दिला.
बाबासाहेबांनी हिंदु धर्म सोडण्यासाठी हिंदु शंकराचार्य आणि तथाकथित हिंदु धर्मातील तथाकथित  ठेकेदारांना २१ वर्षांचा काळ दिला, असेही शेवटी त्या म्हणाल्या.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.