Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर १३, २०१७

अहिरांचा अपमान करणार्‍या आमदाराला निलंबित करा


प्रतिनिधी/ चंद्रपूर                                                                                                             


Image result for hansraj ahirवेकोलि भूमिअधिग्रहण एल.ए. अँक्ट व सी.बी. अँक्टनुसार होत असल्याने शेतकर्‍यांना मातीमोल भावाने मोबदला मिळत होता व त्यांच्या जमिनी कायम शेतकर्‍यांच्या हातातून जात असल्याने सन २000 पासून ना. हंसराज अहीर यांनी लोकसभेत सर्वप्रथम या कायद्याला विरोध करीत प्रकल्पग्रस्तांचा लढा उभारला. ही वस्तुस्थिती या जिल्ह्य़ातील कोळसा प्रकल्पग्रस्तांना ठाऊक आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून त्यांनी २६ प्रकल्पांना आमची जमीन, आमचा भाव हा नारा देत अडविले व सन २00८ मध्ये ना. अहीर यांच्या पुढाकारातूनच सर्वप्रथम भाववाढीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला व आज जो प्रती एकरी ६, ८ व १0 लाख रुपयांचा शेतकर्‍यांना मोबदला मिळतो आहे. त्यामध्येही ना. अहीर यांचेच महत्त्वपूर्ण योगदान आहे. छत्तीसगड सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील विशेषत: चंद्रपूर, नागपूर व यवतमाळ या जिल्ह्य़ातील कोळसा प्रकल्पग्रस्तांना प्रती एकरी उपरोक्त नमूद दराने भाव मिळावा म्हणून ना. अहीर यांनी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी सखोल पत्रव्यवहार व या संबंधात बैठका घेऊन छत्तीसगडच्या धर्तीवर महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळण्यासाठी प्रस्ताव कोल इंडियाला पाठविण्यामध्येही ना. हंसराज अहीर यांचाच मोलाचा वाटा होता. 

हा प्रस्ताव काँग्रेस सरकारच्या राजवटीत सादर करण्यात आला असला तरी यात ना. हंसराज अहीर यांच्या लढय़ाचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे याबाबतीत काँग्रेसचे विधानसभेचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी ना. हंसराज अहीर यांच्यावर केलेली असभ्य भाषेतील टीका ही निर्थक व फुकटचे श्रेय घेणारी असून एका जबाबदार लोकप्रिय व कार्यक्षम केंद्रीयमंत्र्याला झोडपून काढू, अशा प्रकारची असंसदीय भाषा वडेट्टीवारांनी वापरल्याने मणिशंकर अय्यर फेम विजय वडेट्टीवार यांना काँग्रेस नेतृत्वाने पक्षातून निलंबित करावे, अशी मागणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राहुल सराफ यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी आ. नाना शामकुळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजप नेते विजय राऊत, भाजपा जिल्हा सरचिटणीस राजेश मून, जि.प. सभापती ब्रिजभूषण पाझारे, मनपा स्थायी समिती अध्यक्ष राहुल पावडे यांची उपस्थिती होती.

आ. वडेट्टीवारांनी चंद्रपूर जिल्ह्य़ातील किंबहुना कोळसाबाधित क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीला भाववाढ देण्यासाठी किंवा एल.ए. अँक्ट किंवा सी.बी. अँक्टद्वारे होणारे अधिग्रहण थांबविण्यासाठी पत्रव्यवहार केला असेल तर त्यांनी तो जाहीरपणे दाखविला पाहिजे, अशी आव्हानात्मक टिप्पणी करतानाच राहुल सराफ यांनी आ. वडेट्टीवारांनी याबाबतीत कोल इंडिया किंवा राज्य सरकारला या आशयाचे पत्र लिहिले असेल तर तशी पुष्टी करून दाखवावी, असे आवाहन पत्रापरिषदेत केले.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.